Lokmat Sakhi >Food > घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा पिंक मॉकटेल, येईल रेस्टॉरंटसारखी टेस्ट

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा पिंक मॉकटेल, येईल रेस्टॉरंटसारखी टेस्ट

Pink Mocktail डाळिंब, संत्रा आणि लिंबाच्या रसने बनवा पिंक मॉकटेल, फक्त चवीसाठी नाहीतर आरोग्यासाठीही चांगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 04:37 PM2022-11-08T16:37:16+5:302022-11-08T16:41:26+5:30

Pink Mocktail डाळिंब, संत्रा आणि लिंबाच्या रसने बनवा पिंक मॉकटेल, फक्त चवीसाठी नाहीतर आरोग्यासाठीही चांगले

Make Pink Mocktail at home in an easy way, it will taste like a restaurant | घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा पिंक मॉकटेल, येईल रेस्टॉरंटसारखी टेस्ट

घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा पिंक मॉकटेल, येईल रेस्टॉरंटसारखी टेस्ट

मॉकटेल हे पेय सध्या तरुणांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. कोरोना कालावधीत अनेक लोकं घरच्या घरी विविध रेसिपी घरी ट्राय करून पाहत होते. बाहेरील रेस्टॉरंटमधून खाण्यापेक्षा घरी रेसिपी तयार करायचे. या कालावधीत अनेक लोकांनी मॉकटेलचे विविध प्रकार देखील करून पहिले. मॉकटेल दिसताना खूप फॅन्सी आणि किचकट वाटते. मात्र, हे पेय बनवण्यासाठी खूप सोपे आहे. आज आपण पिंक माॅकटेलची रेसिपी जाणून घेणार आहोत. पिंक माॅकटेल हे घरी असलेल्या फळांपासून बनवण्यात येते. पिंक मॉकटेल चवीला उत्कृष्ट लागते, झटपट बनते आणि आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूयात.

पिंक मॉकटेल बनवण्यासाठी साहित्य

सोडा- अर्धा कप 

बर्फचे तुकडे- अर्धा कप

डाळिंबाचा रस- अर्धा कप

लिंबूचा रस- 1 चमचा

साखर -  चवीनुसार

सजावटीसाठी

स्ट्रॉ

पेपरची छतरी

डाळिंबाचे दाणे

लिंबू अथवा संत्राचे स्लाईस

कृती

प्रथम ग्लासमध्ये बर्फाचा चुरा घाला, आता त्यात साखर घाला, नंतर अर्धा कप सोडा घाला, हे मिश्रण घातल्यानंतर शेवटी डाळिंबाचा रस आणि लिंबाचा रस घालून मिसळा. आता त्यावर थोडे डाळिंबाचे दाणे टाका, एक काचेचा ग्लास घ्या त्यावर लिंबू किंवा संत्र्याचे काप ठेवा, स्ट्रॉ घाला आणि कागदाच्या छत्रीने सजवा. अश्या पद्धतीने तुमचे पिंक मॉकटेल पिण्यासाठी तयार. घरी पाहुणे मंडळी किंवा मित्र परिवार आल्यानंतर आपण पिंक मॉकटेल घरी बनवून देऊ शकता.

Web Title: Make Pink Mocktail at home in an easy way, it will taste like a restaurant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.