Join us

घरी दालमखनी तर करता पण कायम फसते? चिंता विसरा, ‘ही’ रेसिपी चुकणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 19:46 IST

Make Restaurant Style Dal Makhani At Home : दालमखनी बिंधास्त बनवा. या पद्धतीने छानच होणार.

काही भाज्या घरी बनवल्यावर घरचे म्हणतात ही ठीके पण हॉटेलवाली जास्त रुचकर लागते. मग असा पचका झाल्यासारख वाटत ना, की ती भाजी घरी नकोच करायला असं वाटायला लागतं. (Make Restaurant Style Dal Makhani At Home) अशीच एक भाजी म्हणजे दालमखनी. ही सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. पण घरी केल्यावर तिचा रंग निट येत नाही. गोडवा जास्तच झाला. तिखटच झाली.  दाळ आणि पाणी वेगवेगळ राहिलं आहे. अशा गोष्टी बघितल्यावर आपल्यावर "शी बाबा फसली भाजी" असं म्हणायची वेळ येते.(Make Restaurant Style Dal Makhani At Home) पण आता अशी वेळ येणार नाही. या पद्धतीने दालमखणी तयार करा. मग बघा सगळे कसे बोटं चाटत आस्वाद घेतील.

साहित्यकाळी उडदाची डाळ(अख्खा उडीद), राजमा, चण्याची डाळ, तुप, मीठ, लाल तिखट, हळद, पाणी, लसुण, आलं, टोमॅटो, गरम मसाला, ताजी साय, जिरं, लोणी, फ्रेश क्रिम, 

कृती(Make Restaurant Style Dal Makhani At Home)१. उडदाची डाळ, राजमा, चण्याची डाळ रात्रभर भिजवा. कमीत कमी १२ तास तरी भिजवून ठेवा.

२. एका कुकरमध्ये भिजवलेल्या डाळी घ्या. पाणी घ्या आणि छान शिजवून घ्या. शिट्ट्यांमधे अजिबात कंजूसपणा करू नका. तुमच्या कुकरला डाळ जर ३ शिट्ट्यांमध्ये शिजत असेल तर ५ शिट्ट्या काढा. डाळ छान मऊ होऊ द्या.

३. आलं -लसुण पेस्ट वाटून घ्या. पातळ वाटा. टोमॅटो वाटून घ्या. त्याची पेस्ट करा. पाणी शक्यतो वापरू नका. टोमॅटोला पाणी सुटतंच.

४. आता एक कढई घ्या. त्यात तुप घ्या. घरचे तुप असेल तर उत्तमच. पूर्ण भाजी तूप, बटर, लोणी वापरूनच बनवा तेल नको.

५. तुप थोडं तापल्यावर त्यात जिरं घाला. ते तडतडलं की आलं-लसुण पेस्ट घाला. छान परतून घ्या.

६. टोमॅटो पेस्ट घाला. रंग बदलेपर्यंत परता. करपवू नका. मीठ, हळद, गरम मसाला,लाल तिखट घाला. मसाले शिजू द्या. एक वाफ काढा.

७. आता डाळ मिश्रणात घाला. व्यवस्थित ढवळा. छान उकळल्यावर त्यात थोडंस पाणी घाला. लोणी, ताजी साय, फ्रेश क्रिम घाला. या भाजीचा गोडवा सायीमुळेच असतो. पण तुम्हाला गोडंच आवडत असेल तर थोडी साखर घालू शकता.   ८. आता भाजी झाकून आणखी १० ते १५ मिनिटे उकळवा. आणि गरमागरम खा. विकत सारखी हवी असेल तर बटर, लोणी घालताना मात्र वजनाचा विचार करू नका. 

टॅग्स :पाककृतीअन्नसुंदर गृहनियोजन