Lokmat Sakhi >Food > करा शेपूची खमंग कुरकुरीत वडी, शेपू आवडत नाही म्हणत नाक मुरडणारेही मारतील ताव

करा शेपूची खमंग कुरकुरीत वडी, शेपू आवडत नाही म्हणत नाक मुरडणारेही मारतील ताव

Make Shepu's delicious crispy vadi, dill Leaves Vadi /healthy,tasty recipe शेपूची भाजी अनेकांना आवडत नाही, उग्र वास सहन होत नाही त्यावर हा खास पौष्टिक पण चमचमीत उपाय, करा शेपूची वडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 01:09 PM2023-06-16T13:09:32+5:302023-06-16T13:11:34+5:30

Make Shepu's delicious crispy vadi, dill Leaves Vadi /healthy,tasty recipe शेपूची भाजी अनेकांना आवडत नाही, उग्र वास सहन होत नाही त्यावर हा खास पौष्टिक पण चमचमीत उपाय, करा शेपूची वडी

Make Shepu's delicious crispy vadi, dill Leaves Vadi /healthy,tasty recipe | करा शेपूची खमंग कुरकुरीत वडी, शेपू आवडत नाही म्हणत नाक मुरडणारेही मारतील ताव

करा शेपूची खमंग कुरकुरीत वडी, शेपू आवडत नाही म्हणत नाक मुरडणारेही मारतील ताव

शेपूची भाजी कोणाला आवडते तर, कोणाला नाही. शेपूची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. शेपू व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीजने समृद्ध असते. जे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते. काही लोकं शेपूची भाजी खाताना नाकं मुरडतात. जर घरातील सदस्यांना शेपूची भाजी आवडत नसेल तर, शेपूची वडी ही रेसिपी ट्राय करून पाहा.

आजपर्यंत आपण मेथी, पालक, कोथिंबीरीची वडी ट्राय करून पाहिली असेल. या वड्या चवीला भन्नाट लागतात, पण आपण शेपूची वडी नक्कीच ट्राय करून पाहिली नसेल. जर घरात शेपूची जुडी असेल तर, त्याची भाजी न करता वडी ट्राय करून पाहा. शेपूची वडी करण्यासाठी जास्त साहित्य किंवा जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. ही रेसिपी झटपट रेडी होते, चला तर मग या कुरकुरीत पदार्थाची चविष्ट कृती पाहूयात(Make Shepu's delicious crispy vadi, dill Leaves Vadi /healthy,tasty recipe).

शेपूची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

शेपू

बेसन

तांदळाचं पीठ

लसूण - जिरं - हिरव्या मिरचीची पेस्ट

धणे पूड

गरम मसाला

न डाळ भिजत घालण्याची गरज ना वाटण्याची, १५ मिनिटांत करा ब्रेडचे मेदू वडे- करायलाही सोपे

लाल तिखट

मीठ

पाणी

तेल

हळद

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात लसूण - जिरं - हिरव्या मिरचीची पेस्ट, धणे पूड, गरम मसाला पावडर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, ४ टेबलस्पून बेसन, २ टेबलस्पून तांदळाचं पीठ घेऊन मिक्स करा. आता त्यात बारीक चिरलेली शेपू, व पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा. पीठ तयार झाल्यानंतर त्यात एक चमचा तेल घालून ग्रीस करा.

आवळ्याची आंबट-गोड-तिखट चटणी करा १० मिनिटांत, व्हिटॅमिन सीचा खजिना-प्रतिकारशक्तीही वाढेल

दुसरीकडे एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. चाळणीला तेल लावून ग्रीस करा. आता हाताला तेल लावा, व पीठाचे लांबट आकारचे गोळे तयार करा, व चाळणीत ठेवा. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा, व वडे वाफेवर शिजवून घ्या. पीठ थंड झाल्यानंतर त्याचे वडे कापून घ्या. कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात हे वडे सोडून तळून घ्या. वड्याला सोनेरी रंग आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे शेपूची वडी खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Make Shepu's delicious crispy vadi, dill Leaves Vadi /healthy,tasty recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.