Lokmat Sakhi >Food > लालचुटूक आलूबुखारचं आंबट गोड सरबत आणि चटपटीत चटणी करा, चविष्ट आणि गुणकारीही!

लालचुटूक आलूबुखारचं आंबट गोड सरबत आणि चटपटीत चटणी करा, चविष्ट आणि गुणकारीही!

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेतो. मात्र घरच्याघरी तयार केलेल्या आलूबुखारच्या सरबतानंही रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच आलूबुखारची चटणीही चटपटीत लागते आणि पौष्टिकही असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 06:37 PM2021-06-30T18:37:53+5:302021-06-30T18:45:57+5:30

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेतो. मात्र घरच्याघरी तयार केलेल्या आलूबुखारच्या सरबतानंही रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच आलूबुखारची चटणीही चटपटीत लागते आणि पौष्टिकही असते.

Make sour sweet juice and spicy chutney with reddish plums, delicious and healthy too! | लालचुटूक आलूबुखारचं आंबट गोड सरबत आणि चटपटीत चटणी करा, चविष्ट आणि गुणकारीही!

लालचुटूक आलूबुखारचं आंबट गोड सरबत आणि चटपटीत चटणी करा, चविष्ट आणि गुणकारीही!

Highlightsआलूबुखार सरबतानं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.ताज्या आलूबुखारचं सरबत जसं छान होतं तसंच वाळलेले आलूबुखार म्हणजेच प्लम्सची चटणीही छान होते. वडे, कटलेट यासोबत ही चटणी छान लागते.


सरबत प्यायला सगळ्यांनाच आवडतं. मग ¬तु कोणता का असेना? सरबत पटकन ऊर्जा देतं आणि भूकही भागवतं. पण सरबत हे केवळ जीभेची रसनाच भागवतं असं नाही तर ते शरीराला पोष्टिक घटकही देतं. याबाबतीत आलूबुखार या फळाच्या सरबताला म्हणूनच खूप महत्त्व आहे. गोड आंबट चवीचं हे फळ. यात जीवनसत्त्वं, तंतूमय घटक लोह, पोटॅशिअम, अँण्टिऑक्सिडण्टस, जीवाणूविरोधी, संसर्गविरोधी आणि दाहविरोधी घटक असतात. त्यामुळे तज्ज्ञ आलूबुखारचं सरबत नियमित पिण्याचाही सल्ला देतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेतो. मात्र घरच्याघरी तयार केलेल्या आलूबुखारच्या सरबतानंही रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

 

आलूबुखारच्या सरबताचे फायदे

  • आलूबुखारमधे बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो. हा घटक हाडं मजबूत करतो. तसेच यात फ्लेवोनॉइडस आणि फेनोलिक घटक यांचं प्रमाणही जास्त असतं. हे घटक हाडं सुरक्षित ठेवण्याचं काम करतात.
  •  पचनक्रियेस मदत करणारे साबिटॉल आणि आइसेटिन हे तंतूमय घटक या फळात असल्यानं शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित पार पडतात आणि पचनक्रिया सुरळीत होते.
  •  स्तनांच्या कर्करोगास प्रतिबंध करण्याची क्षमता आलूबुखारमधील गुणधर्मात असते. शिवाय हे गुणधर्म ट्युमरमधील पेशींची वाढही रोखतं.
  • चेहेर्‍यावर नैसर्गिक चमक आणि तेज येण्यासाठी त्वचेस पोषक घटक आवश्यक असतात. हे घटक आलूबुखारच्या सरबतातून मिळतात तसेच आलूबुखारचा गर चेहेर्‍यास लावूनही मिळतात.
  • आलूबुखार सरबतानं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आलूबुखारमधे लोह खूप असल्यानं शरीरातील रक्तपेशी वाढण्यास त्याची मदत होते.

 

आलूबुखारचं सरबत कसं कराल?

आलूबुखार स्वच्छ धुवून त्याच्या बारीक फोडी कराव्यात. यातल्या बिया काढून टाकाव्यात. ब्लेंडर किंवा ज्यूसरमधे बारीक केलेले तुकडे, अर्धा ग्लास पानी, थोडी साखर, काळं मीठ आणि मिरे पावडर घालावी. आणि हे सर्व जिन्नस ब्लेंड करुन घ्यावं. हे मिर्शण गाळणीनं गाळून घ्यावं. आणि त्यात थोडं पाणी आणि बर्फाचे तुकडे घालावेत.

 

 

आलूबुखारची चटणी

ताज्या आलूबुखारचं सरबत जसं छान होतं तसंच वाळलेले आलूबुखार म्हणजेच प्लम्सची चटणीही छान होते. वडे, कटलेट यासोबत ही चटणी छान लागते. शिवाय आलूबुखारचे गुणधर्म आणि चटणी करताना घातली जाणारी सामग्री यामुळे ही चटणी चटपटीत आणि पौष्टिकही होते.
चटणी तयार करण्यासाठी एक किलो सुकलेले आलूबुखार, पाव किलो साखर, दोन चमचे मीठ, एक छोटा चमचा लाल तिखट, पाव चमचा दालचिनी, चार लवंगा आणि दोन चमचे व्हिनेगर लागतं.

सुकलेल्या आलूबुखारचे बारीक तुकडे करुन घ्यावेत आणि ते रात्रभर पाण्यात भिजवावेत. दुसर्‍या दिवशी सकाळी भिजलेले तुकडे कुस्करुन घ्यावेत. त्यातल्या बिया काढून टाकाव्यात. मग यत साखर, मीठ, लाल तिखट, दालचिनी आणि लवंगा घालाव्यात. हे मिर्शण मंद आचेवर शिजत ठेवावं. साखर पूर्ण विरघळेपर्यंत मिर्शण गॅसवर ठेवावं. मग मिश्रण घट्ट होण्यासाठी गॅस मोठा करावा. मिश्रण घट्ट होत आलं की त्यात व्हिनेगर घालावं आणि पाच मिनिटं मिश्रण शिजू द्यावं. चटणी थंड झाली की ती हवाबंद डब्यात काढून ठेवावी. फ्रीजमधे ही चटणी भरपूर दिवस टिकते. 

Web Title: Make sour sweet juice and spicy chutney with reddish plums, delicious and healthy too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.