लहान मूलांचा आहार हा अनेक आयांसाठी डोकेदुखीचा भाग असतो. प्रत्येक मुलानुसार आवडीनिवडी वेगळ्या आणि गरजाही वेगळ्या असतात. लहान मुलांच्या बाबतीत भूक तर असते पण समोर आलेला पदार्थ आवडता नसतो, म्हणून खाल्ला जात नाही, असेही अनेकवेळा होते. प्रत्येक लहान मूलाच्या स्वत:च्या आवडीनिवडी असतात. काही मुलांना अमुक एखादा पदार्थ नव्या रुपात आलेला त्यांना खायला आवडतो. त्यामुळे सतत काहितरी नवनवीन द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आवडणारे पदार्थ हेरुन ते जास्तीत जास्त पोषक कसे होतील ते बघितले पाहिजे. पॅनकेक हा बऱ्याचशा लहान मुलांना आवडणारा असा पदार्थ आहे. चॉकलेट पॅनकेक, बनाना पॅनकेक असे वेगवेगळ्या फ्लेवर्डचे पॅनकेक असतात. लहान मुलांना पॅनकेकवर वेगवेगळ्या प्रकारची क्रिम, ड्रायफ्रुटस, चॉकलेट सिरप असे वेगवगेळ्या प्रकारात पॅनकेक खायला आवडते. परंतु जास्त गोड खाल्ल्याने लहान मुलांचे पोट बिघडू शकते. अशावेळी या गोड क्रिमी पॅनकेकना आपण हेल्दी बनवू शकतो. मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत, त्या भाज्या आपण या पॅनकेक मध्ये घालून त्यांना हेल्दी करू शकतो. हे टेस्टी आणि हेल्दी पॅनकेक बनवायचे कसे याची कृती समजून घेऊयात(How To make Spicy Nutritious Pancakes For Kids).
dietician_prachi14 या इंस्टाग्राम पेजवरून व्हेजिटेबल पॅनकेक कसे बनवायचे याबद्दलची साहित्य आणि कृती शेअर करण्यात आली आहे.
साहित्य -
१. रवा - १ कप २. दही - १/४ कप ३. गव्हाचे पीठ - १/२ कप४. मीठ - १/२ टेबलस्पून ५. पाणी - १ कप ६. तेल - २ टेबलस्पून ७. कांदा - १ टेबलस्पून (बारीक चिरलेला)८. टोमॅटो - १ टेबलस्पून (बारीक चिरलेला)९. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१०. हिरवी मिरची - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेली)११. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून१२. मटार - १ टेबलस्पून (वाफवून घेतलेलं)१३. जिरे पावडर - १/२ टेबलस्पून१४. इनो किंवा फ्रुट सॉल्ट - १/२ टेबलस्पून
कृती -
१. सर्वप्रथम एका भांड्यात रवा, गव्हाचे पीठ घेऊन त्यात दही घालून घ्या यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्यावे. २. आता या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, वाफवलेले मटार, हिरवी मिरची घालून ते मिश्रणात एकजीव होऊन द्या. ३. या घट्टसर तयार झालेल्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, जिरे पावडर आणि चिमूटभर खाण्याचा सोडा किंवा इनो घालून हे बॅटर २ ते ३ मिनिटे झाकून ठेवून द्या. ४. थोड्या वेळानंतर गरम तव्यावर तेल सोडून या पिठाचे छोटे - छोटे गोल आकारातील पॅन केक करून घ्या. ५. जर तुमच्याकडे पॅनकेक तयार करण्याचे भांड असेल तर या भांड्यात आधी तेल सोडून मग त्यात हे बॅटर सोडा. यामुळे गोल आकाराचे छान चविष्टय पॅनकेक तयार होतील.
हे तयार झालेलं व्हेजिटेबल पॅनकेक सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करू शकता.