जन्माला आल्यानंतर बाळाची भरपूर काळजी आपण घेतो. हळूहळू मग ते बाळ चालायला लागते, बोलायला लागते त्याचा विकास होत असतो. ८ ते ९ वर्षापर्यंतच्या मुलांना जरा जाण यायला लागते. ( make this protein powder at home - children will become healthy)त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलायला लागतात. हळूहळू आपण खातो ते सगळे पदार्थ आपण मुलांनाही खायला देतो. या वयातील मुलांच्या शरीराचा विकास खरं तर जास्त होत असतो. त्यामुळे त्याच्या आहाराची काळजी घेणे जास्त गरजेचे असते. ( make this protein powder at home - children will become healthy)लहान मुल प्रचंड खेळतात दिवसभर नुसती धावपळ करत असतात. तो व्यायाम त्यांच्या शरीरासाठी चांगलाच असतो. मात्र तेवढी धावपळ करण्यासाठी शरीरामध्ये ताकद येणेही गरजेचे असते. ती ताकद त्यांना अन्नामधून मिळते. त्यामुळे त्याच्या आहाराची काळजी घेणे फारच गरजेचे असते.
लहान मुले पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी टिंगल टवाळ्या करतात. भाज्या खाणे त्यांना आवडत नाही. त्यांना बाहेरच्या पॅकेट फुडची चटक लागल्यानंतर तर, त्यांच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवणे फारच गरजेचे होऊन जाते. लहान मुलांसाठी दूध फार गरजेचे असते. हे सांगण्यासाठी आपल्याला कोणत्या तज्ज्ञची गरज नाही. घरोघरी लहान मुलांना जबरदस्ती दूध पाजले जाते. दुधामध्ये अनेक पोषणतत्वे असतात. ( make this protein powder at home - children will become healthy)मुल जर साधे दूध प्यायला नाही म्हणाले तर आपण त्यांना दुधात बाजारात मिळणाऱ्या पावडर घालून देतो. मात्र त्या मुलांच्या स्वास्थ्यासाठी चांगल्या आहेत का नाही? हा वादाचा प्रश्न आहे. घरीच छान पौष्टिक पावडर तयार करून ठेवायची. रोज एक चमचा पावडर दुधामध्ये घाला मुलांना पोषणही मिळेल आणि चवही आवडेल.
साहित्य
अक्रोड, बदाम, पीठीसाखर, खजूर, काजू, मिल्क पावडर, कोको पावडर, मखाना
कृती
१. एका पॅनमध्ये वाटीभर काजू घ्या. वाटीभर बदाम घ्या. त्यामध्ये वाटीभर अक्रोड घाला. सुकामेका छान परतून घ्या. अजिबात पाणी लागू देऊ नका. छान परतून झाल्यावर एका ताटलीत काढून गार करून घ्या.
२. पीठीसाखर थोडीशीच वापरा. चवीसाठी गरजेची असेल तेवढीच घ्या. त्यामध्ये कोको पावडर घाला. पीठीसाखरेपेक्षा कमी कोको पावडर वापरा. ती चवीला कडू असते. त्यामध्ये मिल्क पावडर घाला. त्या पावडरींचे मिश्रण छान एकजीव करून घ्या. नंतर ते चाळणीने चाळून घ्या.
३. आता मखानाही ड्रायरोस्ट करून घ्या. नंतर सुकामेवा आणि मखाना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका. छान वाटून घ्या. चिकट होऊ देऊ नका. बारीक वाटून घ्या.
४. आता वाटलेली पावडर तयार कोको पावडरच्या मिश्रणाशी एकजीव करून घ्या. हवाबंद डब्यामध्ये ठेवा.
५. मुलांना दूध देताना ग्लासमध्ये चमचाभर पावडर घाला. दुधात छान मिक्स करा आणि प्यायला द्या.