Lokmat Sakhi >Food > करा व्हेजिटेबल पॅनकेक, मुले आवडीने खातील भाज्या! घ्या सोपी रेसिपी...

करा व्हेजिटेबल पॅनकेक, मुले आवडीने खातील भाज्या! घ्या सोपी रेसिपी...

How To Made Vegetable Pancakes At Home : मूल आवडीने खाणाऱ्या पॅनकेकमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून त्यांना व्हिजिटेबल पॅनकेक तयार करून देऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2023 01:52 PM2023-02-11T13:52:01+5:302023-02-11T13:56:18+5:30

How To Made Vegetable Pancakes At Home : मूल आवडीने खाणाऱ्या पॅनकेकमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून त्यांना व्हिजिटेबल पॅनकेक तयार करून देऊ शकतो.

Make vegetable pancakes, children will love to eat vegetables! Get the easy recipe.. | करा व्हेजिटेबल पॅनकेक, मुले आवडीने खातील भाज्या! घ्या सोपी रेसिपी...

करा व्हेजिटेबल पॅनकेक, मुले आवडीने खातील भाज्या! घ्या सोपी रेसिपी...

घरातील लहान मंडळीच नाही तर काहीवेळा मोठी माणसेदेखील विशिष्टय भाज्या खाण्यासाठी नाक मुरडतात. आपली नावडती भाजी ताटात दिसली की लहान मुलांना जेवण नको वाटते.  प्रत्येक आई - वडिलांना असं वाटत असत की आपल्या मुलांना छान सकस आहार द्यावा जेणेकरून त्यांची चांगली वाढ होईल. पण आई - वडिलांचं ऐकतील तर ती मुलं थोडीच. मुलं सहसा त्यांना जे आवडत, मनाला जे रुचत तेच आवडीने खातात. परंतु शेवटी आई - वडिलांचं मन त्यांना मुलांना पोषक व सकस आहार दिल्याशिवाय चैन पडणारच नाही.

अशावेळी आई मुलांच्या आवडीचे पदार्थ कोणते आहेत ते नेमके हेरते आणि त्यात काही पौष्टिक पदार्थांची भर घालूंन त्यांना खायला देते. मुलं भाज्या खाण्यासाठी नाक मुरडत असतील पण पॅनकेक आवडीने खात असतील तर एक सोपी रेसिपी पाहूयात. मूल आवडीने खाणाऱ्या पॅनकेकमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून त्यांना व्हिजिटेबल पॅनकेक तयार करून देऊ शकतो. यामुळे सगळ्या भाज्यांचे पौष्टिक घटक त्यांना मिळतील आणि पॅनकेक खाल्ल्याचा आनंदही होईल(How To Made Vegetable Pancakes At Home).

साहित्य :- 

१. कांदा - १ कप (उभा चिरून घेतलेला)
२. गाजर - १ कप (उभे चिरून घेतलेलं)
३. ढोबळी मिरची - १ कप (उभी चिरून घेतलेली)
४. कच्चा बटाटा - १ कप (उभा किसून घेतलेला)
५. हिरवी मिरची - १/२ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)
६. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)
७. बेसन - १ टेबलस्पून 
८. कॉर्न फ्लॉवर - १ टेबलस्पून 
९. मीठ - चवीनुसार 
१०. काळीमिरी पूड - चिमूटभर 
११. हळद - चवीनुसार 
१२. मॅगी क्यूब मसाला - १ टेबलस्पून 
१३. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
१४. पाणी - गरजेनुसार 

कृती :- 

१. एक मोठा बाऊल घेऊन त्यात वरील सर्व साहित्य एकत्रित करावे. 
२. आता व्हेजिटेबल पॅनकेकचे बॅटर तयार करण्यासाठी त्यात गरजेनुसार पाणी घालावे. 


३. पाणी एकाच वेळी एकदम घालू नये. मिश्रण थोडे चमच्याने ढळवून मग हळुहळु पाणी घालावे. 
४. पॅनकेकचे बॅटर एकदम घट्ट किंवा एकदम पातळ करू नये. 


५. आता एका पॅनमध्ये चमचाभर तेल घालून त्यावर हे पॅनकेकचे बॅटर गोल आकारात डोस्याप्रमाणे सोडा. 
६. हे व्हेजिटेबल पॅनकेक व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्या. 
७. पॅनकेक शिजताना ते खालून चिटकू नयेत म्हणून अधून मधून तेलाचे थेंब बाजूने सोडत राहा. 

व्हेजिटेबल पॅनकेक खाण्यासाठी तयार आहेत. गरमागरम व्हेजिटेबल पॅनकेक सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Web Title: Make vegetable pancakes, children will love to eat vegetables! Get the easy recipe..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.