Lokmat Sakhi >Food > सूप-भाज्यांसाठी लागणारी टमाटा पावडर घरच्याघरीही सहज करता येते, पावडर आणि टमाटा मसाल्याची खास कृती

सूप-भाज्यांसाठी लागणारी टमाटा पावडर घरच्याघरीही सहज करता येते, पावडर आणि टमाटा मसाल्याची खास कृती

विविध पदार्थांमध्ये टमाटा पावडर (tomato powder) आणि टमाटा मसाला (tomato masala) वापरुन त्यांना चटपटीत चव आणता येते. त्यासाठी टमाटा पावडर आणि टमाटा मसाला बाहेरुन विकत आणला जातो. पण हे घरच्याघरी तयार करणं ( how to make tomato powder and tomato masala at home) अगदी सोपं आहे. घरी तयार केलेली टमाटा पावडर आणि टमाटा मसाल्यामध्ये भेसळ नसते त्यामुळे घरी तयार केलेली पावडर आणि मसाला वापरण्यास सुरक्षितही असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2022 08:15 AM2022-09-08T08:15:40+5:302022-09-08T08:20:02+5:30

विविध पदार्थांमध्ये टमाटा पावडर (tomato powder) आणि टमाटा मसाला (tomato masala) वापरुन त्यांना चटपटीत चव आणता येते. त्यासाठी टमाटा पावडर आणि टमाटा मसाला बाहेरुन विकत आणला जातो. पण हे घरच्याघरी तयार करणं ( how to make tomato powder and tomato masala at home) अगदी सोपं आहे. घरी तयार केलेली टमाटा पावडर आणि टमाटा मसाल्यामध्ये भेसळ नसते त्यामुळे घरी तयार केलेली पावडर आणि मसाला वापरण्यास सुरक्षितही असतो.

Make your own tomato powder and tomato masala with simpler recipe | सूप-भाज्यांसाठी लागणारी टमाटा पावडर घरच्याघरीही सहज करता येते, पावडर आणि टमाटा मसाल्याची खास कृती

सूप-भाज्यांसाठी लागणारी टमाटा पावडर घरच्याघरीही सहज करता येते, पावडर आणि टमाटा मसाल्याची खास कृती

Highlights टमाटा पावडर आणि टमाटा मसाला करण्यासाठी टमाटे ताजे आणि लालबुंद घ्यावेत.टमाट्याच्या गोल चकत्या करुन त्या उन्हात दोन दिवस वाळवून घ्याव्यात.टमाटा मसाला आणि पावडर तयार केल्यानंतर सहा महिन्याच्या आत वापरावे. 

घरच्याघरी सूप, साॅस बनवण्यासाठी टमाट्याची पावडर लागते. सॅलेडमध्ये वरुन चाट मसाल्याप्रमाणे टमाटा पावडर भुरभुरुन टाकल्यास छान चव येते. तसेच भाज्यांची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी, पुलावाचे विविध प्रकार करताना  टमाटा पावडरचा (tomato powder)  आणि टमाटा मसाल्याचाही वापर करता येतो. विविध पदार्थांमध्ये टमाटा पावडर आणि टमाटा मसाला (tomato masala)  वापरुन त्यांना चटपटीत चव आणता येते.  त्यासाठी टमाटा पावडर आणि टमाटा मसाला बाहेरुन विकत आणला जातो. पण हे घरच्याघरी तयार करणं (how to make tomato powder and tomato masala) अगदी सोपं आहे. घरी तयार केलेली टमाटा पावडर आणि टमाटा मसाल्यामध्ये भेसळ नसते त्यामुळे  घरी तयार केलेली पावडर आणि मसाला वापरण्यास सुरक्षितही असतो. 

Image: Google

कशी तयार करायची टमाटा पावडर?

टमाटा पावडर तयार करण्यासाठी पाव किलो ताजे लाल टमाटे घ्यावेत. टमाटा पावडर तयार करताना आधी टमाटे स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. टमाटे पातळ गोल तुकडे करुन चिरुन घ्यावेत. टमाट्याच्या चकत्या पसरट मोट्या ताटात पसरुन ठेवाव्या. दोन दिवस टमाट्याच्या चकत्या वाळवाव्यात. त्या चांगल्या आणि लवकर सुकण्यासाठी टमाट्याच्या चकत्या मायक्रोवेव ओव्हनमध्ये ठेवून सुकवून घेतल्या तरी चालतात. वाळलेले टमाट्याचे तुकडे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावेत.  टमाट्याची पावडर मिक्सरमधून काढून ताटात पसरवून ठेवावी.  एक दिवस ही पावडर पुन्हा वाळवावी. नंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टमाट्याची पावडर  घालून बारीक वाटावी. बारीक केलेली पावडर  चाळणीनं चाळून घ्यावी. हवाबंद बरणीत भरुन ठेवावी. 

Image: Google

टमाटा मसाला

टमाटा मसाला तयार करण्यासाठी पाव किलो लालबुंद टमाटे, अर्धा चमचा काळी मिरे, 2 सुक्या लाल मिरच्या, चिमूटभर सैंधव मीठ, चिमूटभर मीठ, थोडी कोथिंबीर आणि 2- 3 तमालपत्रं घ्यावेत. टमाटा मसाला तयार करताना टमाटे धुवून पुसून घ्यावेत. टमाटे गोल चकत्या करुन चिरुन घ्यावेत. टमाटे ताटात पसरवून दोन दिवस उन्हात वाळवून घ्यावेत.  कोथिंबीर निवडून, धुवून सुकवून घ्यावी.  कढईत तमाल पत्रं, काळे मिरे, लाल मिरच्या हे मसाले कोरडे वाटून घ्यावेत.  हे मसाले ताटात काढून गार होवू द्यावेत. मिक्सरच्या भांड्यात सुकवलेले टमाटे, भाजलेले मसाले, वाळवलेली कोथिंबीर, सैंधव मीठ आणि साधं मीठ घालून हे सर्व बारीक वाटून घ्यावं. हा मसाला ओबड धोबड वाटला तरी चालतो किंवा त्याची बारीक पूड  केली तरी चालते. 

टमाटा पावडर आणि टमाटा मसाला हवाबंद बरणीत भरुन ठेवावे. ही बरणी उन्हात आणि गरम जागेपासून दूर ठेवावी. पावडर आणि मसाला दीर्घकाळ टिकण्यासठी बरणीत थोडे तांदळाचे दाणे घालवेत म्हणजे ते कोरडे राहातील. टमाटा पावडर आणि मसाला तयार केल्यापासून सहा महिन्याच्या आत वापरावेत. नाहीतर त्याचा रंग आणि स्वाद फिका पडतो. 


 

Web Title: Make your own tomato powder and tomato masala with simpler recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.