थंडीचे दिवस सुरु झालेत की, प्रत्येक घरात लाडू तयार केले जातात (Winter Special Laddoo). मेथी, डिंक, खोबरं, ड्रायफ्रुट्स यासह अळीवाचे लाडू आवडीने खाल्ले जातात. काहींना सुकामेवा किंवा मेथी खायला नाही आवडत. यासाठी घरातील गृहिणी त्यांच्यासाठी खास लाडू तयार करून खायला देतात. पण आपण कधी खोबरं (Dry coconut) आणि मखाणाचे (Makhana) लाडू खाऊन पाहिलं आहे का?
मखाणा आणि खोबरं खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे हिवाळ्यातील आजार तर दूर होतातच, शिवाय आरोग्याला अनेक पौष्टीक घटक प्रदान करतात (Cooking Tips). जर आपल्याला खोबरं आणि मखाणा खायला आवडत नसेल तर, त्याचे लाडू तयार करून खा. मखाणा आणि खोबऱ्याचे लाडू चवीला तर भन्नाट लागतातच शिवाय, लाडू तयार करायलाही सोपे आहेत. चला तर मग पौष्टीक खोबरं मखाणाचे लाडू कसे तयार करायचे? पाहूयात(Makhana Coconut Ladoo Recipe-best for Bones).
खोबरं आणि मखाणाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य(Makhana Coconut Laddoo Recipe in Marathi)
खोबरं
मखाणा
खजूर
वेलची
कृती
सर्वप्रथम, सुकं खोबऱ्याचे साल सोलून काढा. नंतर त्याचे छोटे तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबऱ्याचे तुकडे घालून बारीक करून घ्या. जेणेकरून आपला सुकं खोबरं किसण्याचा वेळ नक्कीच वाचेल. तयार सुकं खोबऱ्याचा किस एका बाऊलमध्ये काढून घ्या. दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात कपभर मखाणा घालून भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्यात मखाणे आणि वेलची घालून त्याची पावडर तयार करा. पॅनमध्ये एक कप खजुराची पेस्ट घाला. (खजुराची पेस्ट तयार करण्यासाठी, आधी खजूर ३० मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील बिया काढून मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करा).
गाजर हलवा कधी जास्त शिजतो, गचका होतो? गाजर हलवा परफेक्ट जमण्यासाठी ही घ्या कृती
पेस्ट घातल्यानंतर त्यात सुकं खोबऱ्याचा किस आणि मखाण्याची तयार पावडर घालून मिक्स करा. साहित्य एकजीव केल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर त्याचे लाडू वळवून घ्या. अशाप्रकारे पौष्टीक खोबरं-मखाणाचे लाडू खाण्यासाठी रेडी. आपण हे लाडू हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता. हे लाडू महिनाभर टिकतात.