Join us  

भाजणी न करता करा मालवणी वडे, मस्त खमंग आणि खुसखुशीत! करा खास पावसाळी बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2023 4:32 PM

MALVANI VADE (made in 30 Minutes) | rice flour vada कमी तेल पिणारे - भाजणीविना करा क्रिस्पी कोकणी वडे, चव भन्नाट करायलाही सोपे..

कोकण (Kokan) म्हटलं की निसर्गरम्य ठिकाण. जिथे नारळाची झाडं, समुद्र, हिरवेगार जंगलाचा अनुभव नेत्रदीपक ठरतो. एकंदरीत म्हणाल तर निर्गाचे घर. कोकणात अनेक पदार्थ फेमस आहे. त्यातील एक म्हणजे कोकणी वडे. ज्याला मालवणी वडे असे देखील म्हणतात. कोकणी वडे चवीला भन्नाट लागतात. पण हे वडे बनवणे खूप कठीण जाते.

अचूक प्रमाणात साहित्यांचा वापर करून हा पदार्थ केला जातो, जर प्रमाण चुकले तर, हा पदार्थ फसतो.  जर आपल्याला भाजणीविना कोकणी वडे तयार करायचे असतील तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. व हे वडे जास्त तेलकट होऊ नये, यासाठी काही टिप्स फॉलो करा. जेणेकरून कोकणी वडे चवीला खुसखुशीत - खमंग टम्म फुगलेले तयार होतील(MALVANI VADE (made in 30 Minutes) | rice flour vada).

कोकणी वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

बेसन

तांदळाचं पीठ

रवा

गुळ

शिळ्या चपातीचं काय करावं सुचत नाही? १० मिनिटात करा कुरकुरीत डोसा, चव भन्नाट - टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन

मीठ

बडीशेप

धणे

मेथी दाणे

हळद

तेल

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये २ वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी बारीक रवा घेऊन मिक्स करा. आता एका भांड्यात २ वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात थोडं गुळ, चवीनुसार मीठ घालून पाण्याला एक उकळी येऊ द्या. दुसरीकडे फोडणीच्या पळीत एक चमचा बडीशेप, २ चमचे धणे, व अर्धा चमचा मेथी दाणे घालून भाजून घ्या. मसाले भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा. व मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची बारीक पावडर तयार करून घ्या. तयार मसाला व एक चमचा हळद घालून पिठात मिक्स करून घ्या. आता त्यात उकळतं पाणी घालून चमच्याने पीठ मिक्स करा.

५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेऊन द्या. ५ मिनिटानंतर हाताने पीठ मळून घ्या. पीठ मळताना आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ जास्त पातळ न मळता घट्टसर मळावे. जेणेकरून तळताना वडे जास्त तेल शोषून घेणार नाही. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर पीठ पुन्हा मळून घ्या. व त्याचे छोटे गोळे तयार करा.

अस्सल गावरान झणझणीत खर्डा करण्याची मस्त रेसिपी, १० मिनिटात खर्डा तयार-जेवा पोटभर

आता एक प्लास्टिकची शीट घ्या, याला थोडे तेल लावून ग्रीस करा, व या शीटवर वडे गोलाकाराने थापून घ्या. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात वडे सोडून मध्यम आचेवर तळून घ्या. जेणेकरून वडे जास्त तेल पिणार नाही. अशा प्रकारे कोकणी वडे खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स