आपल्याला विदेशी पदार्थांची क्रेझ असते, तशीच परदेशी लोकांना भारतीय पदार्थांची चव आवडते. इडली, डोसा, वडापाव, पावभाजी असे पदार्थ विदेशातले लोक मोठ्या आवडीने खातात. आता सध्या एका अमेरिकन तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या युवकाने भारताच्या दौऱ्यावर असताना एकदा राजस्थानचा प्रसिद्ध मिरची वडा खाऊन पाहिला होता. हा वडा त्याला एवढा आवडला की त्याने परदेशात (Man in America fall in love with Rajasthani mirchi vada) जाऊन तो करून पाहिला. त्याचा तो व्हिडिओ आणि मिरची वडा करण्याची रेसिपी (Rajasthani mirchi vada recipe) सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
राजस्थानी मिरची वडा रेसिपीJAKE DRYAN असं त्या तरुणाचं नाव असून त्याला वेगवेगळे पदार्थ चाखून बघण्याची आणि करून पाहण्याची आवड आहे, हे त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून दिसून येतं. बघा मिरची वडा तयार करण्यासाठी त्याने वापरलेली रेसिपी...साहित्य५ ते ६ मोठ्या मिरच्या
हिमोग्लोबिन नेहमी कमीच असतं? ३ प्रकारच्या गोष्टी खा, लोहाची कमतरता होईल दूर१ मोठा उकडलेला बटाटाचिमूटभर हळदआमचूर पावडरचाट मसालाचवीनुसार तिखट आणि मीठअर्धी वाटी बेसन पीठतळण्यासाठी तेल
कृती१. सगळ्यात आधी उकडलेला बटाटा कुस्करून घ्या आणि त्यात मीठ, हळद, तिखट, चाट मसाला, आवडत असल्यास धने- जीरे पूड घाला. सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. तुम्ही यात चिरलेला कांदाही घालू शकता.
डाळिंब खाऊन सालं फेकून देऊ नका; डाळिंबाच्या सालींचे ८ जबरदस्त फायदे, अत्यंत आरोग्यदायी उपयोग
२. त्याचप्रमाणे एका दुसऱ्या भांड्यात बेसन पीठ घ्या. त्यातही मीठ, हळद, तिखट, चाट मसाला, गरम मसाला असं सगळं घाला. पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्या. खूप घट्ट किंवा खूप पातळ भिजवू नका.
३. आता मिरच्यांवर उभे काप द्या आणि त्याच्या आतल्या सगळ्या बिया काढून टाका. बटाट्याचं सारण मिरच्यांमध्ये काठोकाठ भरा. आता या मिरच्या बेसन पीठात घोळून घ्या आणि नंतर तेलात टाकून मध्यम आचेवर तळून घ्या.
४. गरमागरम राजस्थानी भरवा मिर्च किंवा मिरची वडा झाला तयार...