Lokmat Sakhi >Food > बघा परदेशी पाहुणा करतोय कशा मऊसूत इडल्या आणि चटकदार सांबार.. व्हिडिओ व्हायरल

बघा परदेशी पाहुणा करतोय कशा मऊसूत इडल्या आणि चटकदार सांबार.. व्हिडिओ व्हायरल

Special Recipe of Rava (semolina) Idli With Tasty Sambhar: एका परदेशी माणसाने (Man in UK) इडली- सांबार करण्याचा घातलेला घाट नेटिझन्सला भारीच आवडला आहे. त्याची ही रेसिपी चांगलीच व्हायरल झाली आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 02:00 PM2022-12-26T14:00:53+5:302022-12-26T17:48:12+5:30

Special Recipe of Rava (semolina) Idli With Tasty Sambhar: एका परदेशी माणसाने (Man in UK) इडली- सांबार करण्याचा घातलेला घाट नेटिझन्सला भारीच आवडला आहे. त्याची ही रेसिपी चांगलीच व्हायरल झाली आहे. 

Man in UK made spongy rava idli with tasty delicious sambhar, Look at this viral recipe and try it once | बघा परदेशी पाहुणा करतोय कशा मऊसूत इडल्या आणि चटकदार सांबार.. व्हिडिओ व्हायरल

बघा परदेशी पाहुणा करतोय कशा मऊसूत इडल्या आणि चटकदार सांबार.. व्हिडिओ व्हायरल

Highlightsही रेसिपी सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली असून एकदा अशा पद्धतीने इडली सांबारचा बेत करून बघा. 

इडली सांबार, सामोसा, वडापाव, पावभाजी, पाणीपुरी असे चटकदार भारतीय पदार्थ परदेशी व्यक्तींनाही भारीच आवडतात. भारत भेटीवर आल्यावर तर ते या पदार्थांची ऑथेंटिक चव तर घेतातच. पण जे खूपच पट्टीचे खवय्ये असतात, ते तर या पदार्थांची रेसिपी व्यवस्थित टिपून घेतात आणि त्यांच्या देशात गेल्यावर करूनही पाहतात. जेक ड्रॅन (JAKE DRYAN) या इंग्लंडमध्ये राहणाऱ्या तरुणाचंही (Man in UK) अगदी तसंच आहे. त्याने नुकतीच रवा इडली (semolina idli) आणि सांबार रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे.(viral Recipe of spongy rava idli with delicious sambhar)

इडली सांबारची व्हायरल रेसिपी
१. जेकने शेअर केलेल्या या रेसिपी व्हिडिओला आजवर जवळपास २ लाख लोकांनी लाईक केले आहे. यामध्ये त्याने अगदीच वेगळ्या पद्धतीने रवा इडली तयार केली आहे. त्याची ही रेसिपी वापरून एकदा इडली करून बघायला हरकत नाही. 

पाळीमध्ये खूपच पोट दुखतं? अंशुका परवानी सांगतात अशा वेळी झोपून राहण्याऐवजी ५ व्यायाम करा.. 

२. इडली तयार करण्यासाठी त्याने रवा आणि दही हे मिश्रण एकत्र केले. त्यात चवीनुसार मीठ आणि आलं- लसूण पेस्ट, चिरलेली कोथिंबीर टाकली. हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी घालून खमंग फोडणी केली आणि ती ही इडलीच्या पीठात टाकली. शेवटी थोडा बेकिंग सोडा टाकून हे मिश्रण काही काळ आंबवून त्याच्या इडल्या करून घेतल्या.

 

३. सांबार करण्यासाठी तुरीची डाळ, चिंच, हळद शिजवून घेतली. त्यानंतर मेथ्या, जिरे, तांदूळ, धने, हरबरा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, लाल वाळलेल्या मिरच्या, ओवा, कढीपत्ता असं साहित्य कढईत मंद आचेवर भाजून घेतलं. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून त्याचा होममेड सांबार मसाला तयार केल्या. 

कडाक्याच्या थंडीत घ्यायलाच हवा गरमागरम इराणी चहा, बघा कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

४. नंतर कढई गॅसवर तापायला ठेवली. त्यात फोडणी केली. आवडीच्या भाज्या घालून परतून घेतल्यानंतर त्यात शिजवलेली तुरीची डाळ टाकली. पाणी घातलं आणि तयार केलेला सांबार मसाला टाकला. लाल मिरच्या, कढीपत्ता, मोहरी, हिंग टाकून केलेली फोडणी वरतून टाकली. चवीनुसार मीठ टाकलं आणि सांबार चांगला उकळवून घेतला. ही रेसिपी सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली असून एकदा अशा पद्धतीने इडली सांबारचा बेत करून बघा. 

 

Web Title: Man in UK made spongy rava idli with tasty delicious sambhar, Look at this viral recipe and try it once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.