Join us  

Man Made Dosa On Scooty Seat : भर उन्हात स्कूटीच्या गरमागरम सीटवर पठ्ठ्यानं बनवला डोसा; पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 2:42 PM

Man Made Dosa On Scooty Seat : हैदराबादमधून समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटीच्या सीटवर डोसा बनवताना दिसत आहे.

राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश गरमीचं वातावरण आहे.  यंदाच्या उन्हाचा प्रकार पाहता तो सर्व विक्रम मोडेल, असे वाटते. कडक उन्हामुळे आणि उष्ण वाऱ्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. (Man Made Dosa On Scooty Seat) या कडक उन्हातही लोकांना क्रिएटिव्ही आणि जुगाड यांचं कॉम्बिनेशन सुचत असल्याचं दिसून येतंय.  सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (Such a hot summer man made dosa on scooty seat people were surprised)

हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. हैदराबादमधून समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटीच्या सीटवर डोसा बनवताना दिसत आहे. हे पाहून सोशल मीडिया यूजर्सनाही आश्चर्य वाटले आहे की स्कूटीच्या सीटवर कोणी डोसा कसा बनवू शकते? मात्र, व्हिडीओ पाहिल्यावर ते अगदी खरंखुरं असल्याचे दिसते. तुम्ही बघू शकता की त्या व्यक्तीने डोसा बनवण्यासाठी कोणत्याही पॅनचा वापर केला नाही.

कमाल! लोकलमध्ये बसल्या बसल्या पोरीनं समोरच्या आजींचं हुबेहूब चित्र काढलं; फोटो पाहून तुम्हीही कौतुक कराल

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने स्कूटीच्या सीटवर गॅसच्या स्टोव्हशिवाय फक्त उन्हाचा वापर करून डोसा बनवला. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंटरनेट यूजर्स हैराण झाले आहेत. एक स्कूटी उन्हात उभी असल्याचे दिसते. तिथं एक व्यक्ती येऊन स्कूटीच्या सीटवर डोसा पसरवतो. जास्त उष्णतेमुळे डोसा पटकन शिजल्याचे तुम्ही पाहू शकता.

पठ्ठ्यानं बाईकवर बायकोबद्दल 'असं' काही लिहिलं; व्हायरल फोटो पाहून पोट धरून हसाल!

ती व्यक्ती डोसाही पलटवते आणि नंतर दुसऱ्या बाजूने शिजवते. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच वेळी, अनेक लोक असेही म्हणत आहेत की हे आश्चर्यकारक आहे. याआधीही असाच एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये एका व्यक्तीने टेरेसवर ऑम्लेट बनवले होते. हा व्हिडिओ स्ट्रीटफूड ऑफ भग्यानगर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :अन्नपाककृती