Join us  

आंबेहळदीची पौष्टिक चटणी, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा यांची खास रेसिपी- चविष्ट आणि हेल्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 2:01 PM

How to Make Mango Ginger Chutney: सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Recipe shared by Pooja Makhija) यांनी आंबे हळदीची चटणी कशी करायची, याविषयीचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. बघा त्यांची हेल्दी- पौष्टिक रेसिपी.

ठळक मुद्देआंबे हळदीमध्ये कर्क्यूमिन, फायटोस्टेरॉल, मायसेना, कॅल्सीमाइन, फेनोलिक ऍसिड आणि टेरपेनॉइड्स असे घटक असतात. ते बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करतात.

विविध आजारांवर आंबेहळद अतिशय गुणकारी ठरते (Benefits of Mango ginger), हे तर आपल्याला माहितीच आहे. अंगावर कसली ॲलर्जी उठली किंवा मुक्कामार लागून सूज आली तर त्यावर आंबेहळदीचा लेप लावला जातो. आंबेहळद गुणकारी असली तरी तिचा खाण्यासाठी खूपच कमी वापर केला जातो. आंबेहळदीची चटणी (Mango ginger or ambe halad chutney recipe) आणि लोणचं हे काही पदार्थ मात्र चवीला तर उत्तम असतातच शिवाय पौष्टिकही असतात. म्हणूनच त्याची चटणी कशी करायची, याची एक खास रेसिपी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Pooja Makhija) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केली आहे. 

आंबेहळदीचे फायदे१. आंबे हळदीमध्ये कर्क्यूमिन, फायटोस्टेरॉल, मायसेना, कॅल्सीमाइन, फेनोलिक ऍसिड आणि टेरपेनॉइड्स असे घटक असतात. ते बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करतात.

२. आंबेहळदीमध्ये ॲण्टी फंगल, वेदनाशामक घटकही मोठ्या प्रमाणावर असतात.

बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत

३. शिवाय त्यात ॲण्टीऑक्सिडंट्सचे प्रमाणही भरपूर असते. 

४. भूक वाढण्यासाठी, पचन क्रिया चांगली होण्यासाठीही आंबेहळद फायदेशीर ठरते.

५. त्वचेसाठीही आंबेहळदीचा फायदा होतो. टॅनिंग कमी होण्यास आंबेहळदीचा लेप गुणकारी ठरतो.

 

कशी करायची आंबेहळदीची चटणी?१. आंबेहळदीची चटणी करण्यासाठी पूजा माखिजा यांनी आंबेहळदीचा एक छोटा तुकडा, एक टोमॅटो, आलं, लाल मिरच्या, जिरे, मिरे, उडीद डाळ, हरबरा डाळ, कढीपत्ता, तेल, चवीनुसार मीठ असे साहित्य वापरले आहे.

रक्तदाब नियंत्रित ठेवणारे ५ पदार्थ, तब्येतीला जपायचं तर.... वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

२. चटणी करण्यासाठी आपल्याला ताजी आंबेहळद वापराची आहे. ही हळद आधी धुवून तिचे सालं काढून घ्या. त्यानंतर तिचे बारीक काप करा.

३. टोमॅटोही बारीक चिरून घ्या.

 

४. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यात जिरे, मीरे, उडीद डाळ, लाल मिरच्यांचे तुकडे, हरबरा डाळ, आलं घालून फोडणी करून घ्या.

सकाळी उठल्यावर खूप शिंका येतात- नाक बंद होतं? तज्ज्ञ सांगतात एक सोपा उपाय, करून बघा

५. फोडणी झाली की आंबेहळदीचे काप आणि टोमॅटोचे काप टाकून परतून घ्या. नंतर मीठ घाला आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता घाला. एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करा.

६. हे मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये वाटून त्याची चटणी करून घ्या. वरतून पुन्हा एकदा फोडणी घाला. आंबेहळदीची चटणी तयार. ही चटणी प्रमाणात खावी. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्स