Join us  

आंब्याची काजू कतली करा फक्त १५ मिनिटांत, ताज्या रसाळ आंब्यांचा अप्रतिम पदार्थ-रेसिपी सोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 9:56 AM

Mango Kaju Katli Recipe : आंब्यांचा वापर करून तुम्ही घरच्याघरी चवदार चविष्ट काजू कतलीही बनवू शकता ही बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make kaju katli)

उन्हाळ्याच्या दिवसात  आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आंबे खाण्यासाठी लोक एप्रिल- मे महिन्याची आतुरतेनं वाट पाहतात. आंब्याचा मुरांबा, लोणचं, पन्ह, बर्फी, आंबावडी, आंबाबर्फी असे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. (Kaju Katli Recipe) ताज्या आंब्यांचा वापर करून तुम्ही घरच्याघरी चवदार चविष्ट काजू कतलीही बनवू शकता ही बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make kaju katli)

सगळ्यात आधी आंब्याचे लहान लहान काप करून घ्या. हे काप मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या. नंतर ब्लेंडरमध्ये काजू घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या.  एका स्वच्छ भांड्यात दूध गरम करायला ठेवा. दूध उकळायला लागलं की त्यात १/४ कप दूध पावडर घाला. त्यात बेकिंग सोडा घालून दूध ढवळत राहा. दूध घट्ट झालं की त्यात आंब्याची पेस्ट घाला  हे पेस्ट घट्ट दुधात  एकजीव करून घ्या. 

त्यात बारीक केलेली काजू पावडर घालून मिश्रण पुन्हा एकजीव करा. त्यात वरून काजू आणि पिस्त्याचे तुकडे घालू शकता. मिश्रणाला तूप सुटायला लागल्यानंतर गॅस बंद करा. एका प्लास्टीकच्या पेपरवर हे मिश्रण व्यवस्थित पसरवू घ्या आणि  काजू कतली प्रमाणे पतंगाच्या आकाराचे काप तयार करून घ्या. तयार आहे मँगो काजूकतली.

आंबापोळी कशी बवनायची?

सर्व प्रथम आंबा सोलून त्याचे दाणे काढून त्याचा गर काढा. आता मिक्सरमध्ये घालून  बारीक करा. आता एक कढई ठेवा आणि त्यात तूप गरम करा. ते गरम झाल्यावर त्यात आंब्याचा कोळ, साखर, वेलची पूड घालून चांगले शिजू द्यावे. किमान 10 मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा. 

यानंतर, आपण हे मिश्रण तूप लावून मोठ्या प्लेटवर पसरवू शकता किंवा आपण स्वच्छ प्लास्टिकच्या शीटवर पसरवू शकता. यानंतर उन्हात ठेवा. ते एका बाजूला चांगले सुकल्यावर दुसऱ्या बाजूला उलटा. आंबापोळी तयार आहे.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न