Lokmat Sakhi >Food > घरीच १० मिनिटांत करा मस्त गारेगार मँगो पुडींग; उन्हाळ्यात खाण्यासाठी परफेक्ट डेझर्ट

घरीच १० मिनिटांत करा मस्त गारेगार मँगो पुडींग; उन्हाळ्यात खाण्यासाठी परफेक्ट डेझर्ट

Mango Pudding Easy Recipe : विकतच्या आईस्क्रीम आणि कुल्फीला चविष्ट- भन्नाट पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 01:25 PM2023-05-29T13:25:32+5:302023-05-29T13:40:34+5:30

Mango Pudding Easy Recipe : विकतच्या आईस्क्रीम आणि कुल्फीला चविष्ट- भन्नाट पर्याय...

Mango Pudding Easy Recipe : Make delicious Chilled Mango Pudding at home in 10 minutes; A perfect dessert to eat in summer | घरीच १० मिनिटांत करा मस्त गारेगार मँगो पुडींग; उन्हाळ्यात खाण्यासाठी परफेक्ट डेझर्ट

घरीच १० मिनिटांत करा मस्त गारेगार मँगो पुडींग; उन्हाळ्यात खाण्यासाठी परफेक्ट डेझर्ट

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला सतत गारेगार काहीतरी खावसं वाटतं. मग सारखं बाहेरुन आईस्क्रीम किंवा कुल्फी आणणे नाहीतर कोंल्ड्रींक पिऊन तहान भागवणे असे आपण करत राहतो. पण या दिवसांत आपल्या घरात असलेल्या आंब्यापासून अगदी कमीत कमी पदार्थांपासून आपण घरात १० मिनीटांत मँगो पुडींग तयार करु शकतो. नाश्त्यापासून ते जेवण झाल्यावर खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेला खाता येईल असे हे पुडींग करायला अतिशय सोपे आणि तरीही चवीला खूपच मस्त असल्याने सगळेच आवडीने खाऊ शकतात (Mango Pudding Easy Recipe) .

स्पॉंजी उतप्पासाठी पीठ भिजवण्याची सोपी पद्धत; सोबत साऊथ इंडियन स्टाईल लाल चटणी, ब्रेकफास्ट होईल परफेक्ट

यासाठी मारीची बिस्कीटे, आंबा, साखर, साय किंवा कस्टर्ड आणि आवडीप्रमाणे सुकामेवा किंवा टुटीफ्रूटी वगैरे आपण घालू शकतो. हे डेझर्ट करायला अगदी १० मिनीटे लागत असल्याने फार वेळ जात नाही. साधारणपणे घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून होत असल्याने आणि विशेष खर्चही येत नाही.  हे सगळे सेट झाल्यावर इतके छान लागते की विकतच्या डेझर्टची आणि आईस्क्रीमची चवही आपण विसरुन जाऊ. चला तर मग पाहूयात हे पुडींग नेमके कसे करायचे. 

(Image : Google)
(Image : Google)

१. २ हापूस आंबे स्वच्छ धुवून त्याची साले काढून गराच्या एकसारख्या फोडी करुन घ्यायच्या. 

२. आणखी २ आंब्याचा रस काढून घ्यायचा. आवडीप्रमाणे हा रस तसाच ठेवून किंवा मिक्सर करुन घेतला तरी चालतो. 

३. मारीची १० ते १२ बिस्कीटे घेऊन त्याचा थोडा ओबडधोबड चुरा करुन घ्यायचा.

४. एका भांड्यात आंब्याच्या फोडी घालून त्यात ४ चमचे साखर घालून ते चांगले शिजवून घ्यायचे. आवडीप्रमाणे यामध्ये सुकामेव्याचे तुकडे घालू शकतो.

५. दुधावर आलेली घट्ट साय एकजीव करुन घ्यायची किंवा कंडेन्स मिल्क एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे.

६. साधारण ४ बाऊल घेऊन त्यामध्ये सगळ्यात खाली बिस्कीटांचा चुरा घालावा.

७. त्यावर आंब्याच्या फोडी आणि साखरेची केलेली जेली घालावी. त्यावर साय किंवा कडेन्स्ड मिल्क घालावे.

८. सगळ्यात शेवटी यावर थोडासा आमरस घालावा. लेअर्सचा एक सेट झाल्यानंतर हे सगळे पुन्हा एकदा याच क्रमाने घालून आणखी एक लेअर करावा. 

९. हे बाऊल बंद करुन फ्रिजरमध्ये ५ ते ६ तास सेट होण्यसाठी ठेवावेत. त्यानंतर २ तास फ्रिजमध्ये ठेवून मग खाण्यासाठी घ्यावेत.

Web Title: Mango Pudding Easy Recipe : Make delicious Chilled Mango Pudding at home in 10 minutes; A perfect dessert to eat in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.