Lokmat Sakhi >Food > Mango Pudina Chutney Recipe : जेवताना तोंडी लावण्यासाठी १० मिनिटात करा कैरी पुदीन्याची चटपटीत चटणी; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

Mango Pudina Chutney Recipe : जेवताना तोंडी लावण्यासाठी १० मिनिटात करा कैरी पुदीन्याची चटपटीत चटणी; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

Mango Pudina Chutney Recipe : चटणी बनवायला सोपी तर आहेच, पण उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासोबतच ही चटणी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:43 PM2022-04-19T13:43:37+5:302022-04-19T13:50:03+5:30

Mango Pudina Chutney Recipe : चटणी बनवायला सोपी तर आहेच, पण उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासोबतच ही चटणी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे.

Mango Pudina Chutney Recipe : How to make mango mint sweet chutney recipe | Mango Pudina Chutney Recipe : जेवताना तोंडी लावण्यासाठी १० मिनिटात करा कैरी पुदीन्याची चटपटीत चटणी; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

Mango Pudina Chutney Recipe : जेवताना तोंडी लावण्यासाठी १० मिनिटात करा कैरी पुदीन्याची चटपटीत चटणी; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

कैरीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं.  लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने कैरीचे वेगवेगळे पदार्थ खाण्याचा आनंद घेतात. (Mango Pudina Chutney Recipe) कैरी कच्ची खाण्याव्यतिरिक्त, तुम्ही कच्च्या कैरीची चटणी,  गोड आणि आंबट लोणचे, आंब्याचे आइस्क्रीम इत्यादी अनेक स्वादिष्ट पाककृती बनवू शकता. रोजच्या जेवणाला तोंडी लावायला तुम्ही आंबा आणि पुदिन्याच्या मदतीने  गोड चटणी देखील बनवू शकता. (How to make mango mint sweet chutney recipe)

ही चटणी बनवायला सोपी तर आहेच, पण उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासोबतच तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आंबा आणि पुदिन्याच्या गोड चटणीबद्दल सांगणार आहोत. तुम्ही घरीसुद्धा ही चटणी बनवू शकता. (Summer Special Recipes)

साहित्य

आंबा - 500 ग्रॅम (कच्चा किंवा पिकलेला)

मिंट - 200 ग्रॅम

साखर - चवीनुसार किंवा 1 कप

लाल तिखट - 1 टीस्पून

जिरे पावडर - अर्धा टीस्पून

आले पावडर - अर्धा टीस्पून

काळे मीठ - अर्धा टीस्पून

मीठ - चवीनुसार

कृती

चटणी बनवण्यासाठी आधी आंबा नीट धुवून घ्या आणि आंबा सोलून किसून घ्या. 

तसेच पुदिन्याची पाने धुवून बाजूला ठेवा. आता किसलेला आंब्याचा पल्प आणि पुदिन्याची पाने मिक्सर जारमध्ये टाका.

नंतर त्यात साखर आणि अर्धा कप पाणी घाला. नंतर त्यात मीठ, काळे मीठ, आले पावडर, लाल तिखट असे सर्व मसाले घालून बारीक करून घ्या.

आता या चटणीला तुम्ही फोडणी घालू शकता किंवा असचं खाऊ शकता. 

कैरी आणि पुदिन्याची चटणी तयार आहे. तुम्ही पराठ्यासोबत, डोश्यासोबत किंवा चपातीसह सर्व्ह करू शकता.
 

Web Title: Mango Pudina Chutney Recipe : How to make mango mint sweet chutney recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.