इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या फूड ब्लॉगरर्सचे विविध पदार्थ बनवण्याचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. तर काहीवेळा हे लोक वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन त्या ठिकाणची खासियत सांगतात. पानआईस्क्रीम, पिझ्झा पुरणपोळी, लसूण आईस्क्रीम, नुडल्स पराठा, चॉकलेट बटाटावडा असे विचित्र फूड कॉम्बिनेशन्स आजपर्यंत अनेकदा लोकांनी पाहिले. असे व्हिडिओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. या व्हिडिओंना बरेच लाईक्स आणि शेअर्स मिळतात. (Man’s way of making dosa in viral video makes people say ‘stop wasting food’viral Video)
फूड ब्लॉगर रेकीब आलमने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओने लोक नाराज झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक माणूस नेहमीच्या पद्धतीने डोसा तयार करताना दिसत आहे. या क्लिपने नेटिझन्सना असे म्हणण्यास प्रवृत्त केले आहे की, या माणसाच्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमुळे अन्नाची नासाडी होत आहे. डोसा बनवताना गरज नसताना जास्तीचे पदार्थ वापरले जात आहेत. यामुळे अन्न वाया जात असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे.
हा व्हिडिओ ९ एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला होता. शेअर केल्यापासून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत, त्याला दोन दशलक्षाहून अधिक व्हिव्हज मिळाले आहेत आणि संख्या वाढत आहे. शिवाय अनेक लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. तुम्ही अन्न वाया घालवत आहात, असे न केलेलेच बरे, धान्याचा आदर करा, जर ते जास्त असेल तर ते एखाद्या गरीबाला द्या, तुम्हाला आशीर्वाद मिळेल. अशी कमेंट एका दुसरनं केली आहे.
आंब्याची काजू कतली करा फक्त १५ मिनिटांत, ताज्या रसाळ आंब्यांचा अप्रतिम पदार्थ-रेसिपी सोपी
याआधीही असेच व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यात पावभाजी बनवताना बटरचा अतिवापर केलेला दाखवण्यात आला होता. बटरचा अतिवापर केल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला धोका पोहोचतो. कारण फॅटफूल पदार्थ अति खाल्ल्यानं शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. म्हणून बाहेरचं कमीत कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.