जेवणात चटणी, लोणचं, कोशिंबीर असं सगळं असेल तर जेवणाची रंगत कशी वाढत जाते. पण कधी कधी असं होतं की यातलं काहीच नसतं. किंवा असलं तरी ते त्याच त्या चवीचं असल्याने आपल्याला खावंसं वाटत नाही. अशावेळी चव बदल म्हणून वेगळं काही करून बघायचं असेल तर ही घ्या एक मराठवाडा स्पेशल पारंपरिक रेसिपी (Marathwada Special Recipe). तिखट- लसूण यांचा वापर करून तयार केलेला हा खुडा किंवा चटणी (spicy and delicious Garlic- chilli chutney) चवीला अतिशय खमंग- झणझणीत लागते. शिवाय अगदी ५ मिनिटांत तयार होते.
लाल तिखट आणि लसणाचा खुडा
या रेसिपीला कदाचित वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावं असू शकतात. पण मराठवाड्यात हा पदार्थ तिखट- लसूणाचा खुडा किंवा तळलेलं तिखट या नावाने ओळखला जातो.
तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही या ५ चुका करताय का
कोणत्याही प्रकारच्या जेवणात तुम्ही तोंडी लावण्यासाठी चटणीप्रमाणे हा पदार्थ खाऊ शकता. ज्वारी, बाजरीच्या भाकरीसोबत हा पदार्थ खाण्याची मजा मात्र काही वेगळीच आहे. पिठलं- भाकरी, कांदा असा अस्सल गावरान बेत केला असेल तर त्यासोबत तिखटाचा खुडा नक्की घ्या. जेवणाची रंगत नक्कीच वाढेल.
साहित्य
३ टेबलस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून तीळ
सरसोंका साग- मक्के की रोटी! थंडीमध्ये व्हायलाच हवा अनुष्का शर्माचा हा फेव्हरेट मेन्यू- बघा चमचमीत रेसिपी
२ टेबलस्पून तेल
१० ते १२ लसूणाच्या पाकळ्या
१ टीस्पून जीरे
चवीनुसार मीठ
कृती
१. सगळ्यात आधी तर लसूण सोलून घ्या आणि त्याचे बारीक- बारीक काप करून घ्या.
२. नंतर फोडणी करण्याची जी लहान कढई असते ती गॅसवर ठेवा. त्यात तेल टाका. तेल तापल्यानंतर जीरे टाकून फोडणी करून घ्या.
फॅशनेबल म्हणून ५ चुका टाळा, पाहा क्लासी लूकसाठी ॲक्सेसरीजची परफेक्ट निवड कशी करायची?
३. ही सगळी रेसिपी करताना गॅस मंद आचेवर ठेवावा. फोडणी झाल्यानंतर तेलामध्ये तीळ आणि लसूण घाला. तीळ चांगले लालसर परतून घ्या. ते जळणार नाहीत, याची मात्र काळजी घ्या.
४. त्यानंतर तिखट घाला आणि चवीनुसार मीठ घाला. गॅस एकदम कमी ठेवा. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. तिखट चांगलं परतून झालं की गॅस बंद करा. खमंग- झणझणीत खुडा तयार.