Lokmat Sakhi >Food > मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : नैवेद्यासाठी पटकन करा स्वादीष्ट शेवयांची खीर; कमी वेळेत होईल उत्तम नेवेद्य

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : नैवेद्यासाठी पटकन करा स्वादीष्ट शेवयांची खीर; कमी वेळेत होईल उत्तम नेवेद्य

Margashirsha Guruvar 2023 (Shevyanchi Kheer Kashi kartat) : दूध, साखर, ड्रायफ्रुट्स हे साधं साहित्य वापरून तुम्ही उत्तम खीर बनवू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:16 AM2023-12-14T09:16:00+5:302023-12-14T15:22:23+5:30

Margashirsha Guruvar 2023 (Shevyanchi Kheer Kashi kartat) : दूध, साखर, ड्रायफ्रुट्स हे साधं साहित्य वापरून तुम्ही उत्तम खीर बनवू शकता. 

Margashirsha Guruvar 2023 : Shevai kheer For Naivedya Margashirsha Guruvar Special Kheer Recipe | मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : नैवेद्यासाठी पटकन करा स्वादीष्ट शेवयांची खीर; कमी वेळेत होईल उत्तम नेवेद्य

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : नैवेद्यासाठी पटकन करा स्वादीष्ट शेवयांची खीर; कमी वेळेत होईल उत्तम नेवेद्य

मार्गशीर्ष महिन्यात (Margashirsha Guruvar 2023) गुरुवारी अनेकजण उपवास करतात. महालक्ष्मीची मनोभावे पूजा करून नैवेद्यही अर्पण केला जातो.  (Naivedya Recipe) नैवेद्य पटकन तयार होईल असा काहीतरी पदार्थ असेल तर कितीही घाई असेल तरी लगेच तयार करता येतो. महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी तुम्ही स्वादीष्ट अशी शेवयांची खीर बनवू शकता. शेवयांची खीर अगदी ५ ते १० मिनिटांत तयार होते. यासाठी तुम्हाला जास्त साहित्यही लागत नाही. दूध, साखर, ड्रायफ्रुट्स हे साधं साहित्य वापरून तुम्ही उत्तम खीर बनवू शकता. (Sevai Kheer Recipe in Marathi)

खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य (How to Make Sevai Kheer)

१) दूध- १ लिटर

२) शेवया- ७० ग्राम

३) साखर- १०० ग्राम साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता.

४) चिरलेले बदाम- ७ ते ८ 

५) मनूके- १० ते १२

६) साजूक तूप- ४ ते ५ टिस्पून

७) वेलची पूड - पाव चमचा

७) लवंग- १ ते २

शेवयांची खीर करण्याची कृती (Sevai Kheer Kashi Karaychi)

1) शेवयांची खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक कढई घ्या त्यात दूध घालून मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. दूधाला उकळी आल्यानंतर त्यात तुपात भाजून घेतलेल्या शेवया आणि लवंग घाला.  

2) व्यवस्थित उकळी आल्यानंतर शेवया आणि दूधाचे मिश्रण घट्ट होऊ द्या. शेवई घट्ट होण्यासाठी जवळपास १५ मिनिटं वेळ लागेल. या वेळेत दूध सतत ढवळत राहा. दूध घट्ट झाल्यानंतर त्यातील लवंग बाजूला काढून घ्या. 

लसूण-लाल मिरचीची करा चटपटीत चटणी; गावरान रेसिपी-थंडीत भूक खवळेल, पोटभर जेवाल

3) नंतर खिरीत साखर घालून पुन्हा एकदा मंच आचेवर शिजवण्यासाठी ठेवा. जवळपाास २ मिनिटं खीर उकळ्यानंतर गॅस बंद कर. खिरीत चिरलेले बदाम आणि मनुके घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर खिरीत अर्धा चमचा तूप आणि बारीक केलेली वेलची घालून खिरीत व्यवस्थित मिसळा.  तुम्ही यात पिस्ता आणि काजूसुद्धा घालू शकता. 

उरलेल्या भाताचा करा क्रिस्पी-टेस्टी डोसा; ५ मिनिटांत बनेल डोसा-फोडणीचा भात करणंच विसराल

4) तयार आहे चविष्ट चवदार शेवयांची खीर. ही गरमागरम खीर नैवेद्यासाठी ठेवल्यानंतर तुम्ही घरातील इतरांनाही देऊ शकता. जर तुम्हाला थंड चवदार खीर आवडत असेल तर २ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. 

Web Title: Margashirsha Guruvar 2023 : Shevai kheer For Naivedya Margashirsha Guruvar Special Kheer Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.