Lokmat Sakhi >Food > १ वाटी रव्याचा करा प्रसादाचा मऊसूत शिरा; १० मिनिटांत बनेल नैवेद्य, परफेक्ट शिऱ्याची रेसिपी

१ वाटी रव्याचा करा प्रसादाचा मऊसूत शिरा; १० मिनिटांत बनेल नैवेद्य, परफेक्ट शिऱ्याची रेसिपी

Margashirsha Guruvar Special (Prasadacha sheera kasa kartat) : प्रसादाचा शीरा बनवणं एकदम सोपं आहे त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 04:35 PM2023-12-14T16:35:08+5:302023-12-14T16:51:28+5:30

Margashirsha Guruvar Special (Prasadacha sheera kasa kartat) : प्रसादाचा शीरा बनवणं एकदम सोपं आहे त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही.

Margashirsha Guruvar Special Prasadacha Sheera Recipe : Rava Sheera Recipe Samolina Sheera Recipe | १ वाटी रव्याचा करा प्रसादाचा मऊसूत शिरा; १० मिनिटांत बनेल नैवेद्य, परफेक्ट शिऱ्याची रेसिपी

१ वाटी रव्याचा करा प्रसादाचा मऊसूत शिरा; १० मिनिटांत बनेल नैवेद्य, परफेक्ट शिऱ्याची रेसिपी

मार्गशीष गुरूवारच्या (Margashirsha Guruvar 2023) नैवेद्यासाठी तुम्ही पटकन काहीतरी करण्याच्या विचारात असाल तर  रव्याचा शीरा बनवू शकता.  रव्याचा शीरा बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. (Naivedya Recipe) कमीत कमी वेळात नैवेद्य बनून तयार होईल. (Sooji ka Sheera) प्रसादाचा शीरा बनवणं एकदम सोपं आहे त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. प्रसादाचा शीरा करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. (Rava Sheera Recipe in Marathi)

प्रसादाचा शीरा कसा करायचा? (How to make Rawa Sheera For Naivedya)

1) सगळ्यात आधी जाडसर रवा घ्या. जास्त बारीक रवा घेऊ नका. यामुळे शीरा दाणेदार होईल. १ कप रव्यासाठी १ कप तूप आणि  १ कप साखर घ्यावी लागेल. याशिवाय जायफळ, ड्रायफ्रुट्सचे काप आणि एक कप केशर घातलेलं दूध लागेल, आवडीनुसार तुम्ही यात केळ्याचे कापही घालू शकता. केळी आवडत नसतील तर सध्या अननसाचा सिजन आहे तुम्ही  शिऱ्यात अननसाच्या फोडी घालू शकता.

2) रवा लोखंडाच्या कढईत व्यवस्थित भाजून घ्या. रवा भाजताना सतत चमच्याने ढवळत राहा अन्यथा रवा खालच्या बाजूने करपू शकतो. रवा भाजून एका भांड्यात काढून घ्या. 

3) त्याच कढईत तूप घालून काजू, बदाम, मनूके, पिस्ते तळून घ्या.  तळताना सगळ्यात शेवटी तुपात मनुके घाला. 

4) कढईत पुन्हा तूप घालून त्यात रवा मिडीयम फ्लेमवर रवा भाजून घ्या. रव्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. त्यात ३ कप पाणी घाला पाणी आणि रवा चमच्याच्या साहाय्याने व्यववस्थित एकजीव करा. 

लसूण-लाल मिरचीची करा चटपटीत चटणी; गावरान रेसिपी-थंडीत भूक खवळेल, पोटभर जेवाल

5) रव्यात पाणी व्यववस्थित एकजीव झाल्यानंतर त्यात साखर घालून पुन्हा एकजीव करा. त्यात तुम्ही साखरेबरोबर केशरचं दूधही घाला. नंतर त्यात ड्रायफ्रुट्स घाला. शीरा हळूहळू घट्ट व्हायला सुरूवात होईल.

 नैवेद्यासाठी पटकन करा स्वादीष्ट शेवयांची खीर; कमी वेळेत होईल उत्तम नेवेद्य

6) ५ ते १० मिनिटं शिजवून गॅस बंद करा. सजावटीसाठी तुम्ही वरून ड्रायफ्रुट्सचे पातळ काप घालू शकता. तयार आहे गरमागरम  प्रसादाचा शीरा.  केळीच्या पानांवर हा शीरा ठेऊन तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. 
 

Web Title: Margashirsha Guruvar Special Prasadacha Sheera Recipe : Rava Sheera Recipe Samolina Sheera Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.