हिवाळा सुरु झाला की बाजारात पालेभाज्यांची हिरवळ (Green Leafy Vegetables) पाहायला मिळते. सर्वत्र मेथी, पालक, कोथिंबीर यासह इतर पालेभाज्या पाहायला मिळतात. या दिवसात पालेभाज्या स्वस्त दरात मिळतात. शिवाय पालेभाज्या शरीराला अनेक पौष्टीक घटक प्रदान करतात. या दिवसात मेथीचे अनेक पदार्थ केले जातात. मेथीची भाजी (Methi chi Bhaaji), भजी, पराठे, मुटके आवडीने खाल्ले जातात.
काही गृहिणी मेथीच्या भाजीला लसणाची फोडणी देऊन तयार करतात. तर, काही जण त्यात शेंगदाण्याचा कूट आणि डाळी घालून भाजी तयार करतात. पण याच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, मेथीची वरणातली भाजी (Fenugreek Varan) करून पाहा. आपण ही भाजी खास मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास सोडण्यासाठी तयार करू शकता (Cooking Tips). ही भाजी करायला तर सोपी आहेच, पचायला हलकी आणि झटपट तयार होते(Margashirsha Thursday Fasting Special: Made Fenugreek Varan, Healthy recipe you will loved it).
मेथीची वरणातली भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य
मेथी
मूग डाळ
मसूर डाळ
लसणाच्या पाकळ्या
गुळ पावडर
आमसूल
बेसन
लाल तिखट
गोडा मसाला
गुळ पावडर
आमसूल
मोहरी
हिंग
हळद
लाल सुकी मिरची
मीठ
कृती
सर्वप्रथम, मेथीची पानं धुवून बारीक चिरून घ्या. नंतर एका भांड्यात ,मूग डाळ आणि मसूर डाळ समप्रमाणात घेऊन शिजत ठेवा. कढईत एक चमचा तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात बारीक चिरलेली मेथी घालून परतवून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. कारण मिठामुळे भाजीचा रंग बदलत नाही. तो तसाच हिरवा राहतो. नंतर मूग डाळ आणि मसूर डाळीच्या वरणात २ चमचे बेसन घालून मिक्स करा. भाजी थोडी शिजली की त्यात एक कप पाणी घाला. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा गुळ पावडर आणि आमसूल घालून मिक्स करा. भाजी शिजली की त्यात वरण आणि बेसनाचं बॅटर घालून मिक्स करा.
फोडणीच्या पळीत २ चमचे तेल घाला. नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण, एक चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, एक चमचा हळद, एक लाल सुकी मिरची घालून मिक्स करा. तयार चुरचुरीत फोडणी मेथीच्या भाजीमध्ये ओतून मिक्स करा. अशा प्रकारे वरणातली मेथीची भाजी खाण्यासाठी रेडी.