Join us  

१० रूपयांचा बिस्कीट पुडा घ्या घरी करा स्वादीष्ट गुलाबजाम, मावा-मैदा न घालताच बनतील परफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 12:14 PM

How to Make Gulabjam at Home (Biscuit gulab jamun recipe) : घरी बनवलेले गुलाबजाम कधी कडक होतात तर बाहेरून व्यवस्थित लाल दिसतात आतून कच्चे राहतात.

सणावाराच्या दिवशी नैवेद्यासाठी किंवा ताटात गोड पदार्थ हवा  म्हणून अनेकजण खीर, शीरा, हलवा असे पदार्थ बनवतात. (Biscuit ke Gulab Jamun) जिलेबी, गुलाबजाम हे पदार्थ सगळ्यांनाच भरपूर आवडत असले तरी घरी बनवणं अवघड वाटतं. (Marie biscuit gulab jamun) बाहेरून आणललेले पदार्थ कितपत ताजे, हेल्दी असतील याचीही खात्री नसते.

घरी बनवलेले गुलाबजाम कधी कडक होतात, बाहेरून व्यवस्थित लाल दिसतात आतून कच्चे राहतात. तर कधी साहित्य जास्त लागतं म्हणून घरी गुलाबजाम करणं टाळलं जातं. १० रूपयांचा बिस्कीटचा पुडा आणून तुम्ही गुलाबजाम बनवू शकता. (How to Make Gulab Jamun at Home) घरात ब्रेड उरले असतील तर तुम्ही ब्रेडच्या तुकड्यांपासूनही गुलाबजाम बनवू शकता. 

साहित्य 

१) बिस्कीट्स- २० ते २५

२) तूप - २ ते ३ चमचे

३) दूध- २ ते ३ कप

४) साखर- ४ ते ५ कप

५) पाणी- २ ते ३ ग्लास

६) वेलची - ३ ते ४ 

कृती (Biscuit Gulab Jamun Recipe)

१) बिस्कीट्सचे गुलाबजाम करण्यासाठी सगळ्यात आधी मारी बिस्कीडचा पुडा आणा आणि सर्व बिस्कीट्स ताटात काढून घ्या. हे बिस्कीट्स बारीक पावडरच्या स्वरूपात दळून घ्या. बिस्कीट बारीक करण्यासाठी तुम्ही मिक्सर किंवा खलबत्याचा वापर करू शकता.

डाळ-तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला; डोश्याचं पीठ मस्त फुलेल, सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे

२) बिस्कीटांचा बारीक चुरा केल्यानंतर त्यात दूध घालून पीठ मळून घ्या. कणीक मऊ होण्यासाठी त्यात तूप घाला. कणीक व्यवस्थित मळून घेतल्यानंतर त्याचे लहान आकाराच बारीक गोळे तयार करून एका ताटात ठेवा आणि थोडावेळासाठी हे गोळे सुकू द्या.

३) गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी एका भांड्यात साखर आणि पाणी घालून गॅसवर ठेवा. साखर वितळल्यानंतर त्यात वेलची घाला आणि गॅस बंद करा.

१ कप कॉफी पिण्याचे जबरदस्त फायदे; नेहमी स्ट्रेस-फ्री राहाल, आजार होतील दूर

४) कढईत तूप गरम करून त्यात गुलाबजाम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. तयार  गुलाबजाम साखरेच्या पाकात घाला. तयार आहेत स्वादीष्ट गुलाबजाम.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स