Join us  

उन्हाळ्यात एक ग्लास मसाला ताकाने ठेवा शरीराला कुल, आरोग्यासाठी उत्तम - चवीला चटकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2023 3:40 PM

Masala Chaas with homemade Chaas Masala मसाला ताकाने बनवा उन्हाळा स्पेशल, घ्या सोपी - झटपट रेसिपी..

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी थंड पदार्थाचे सेवन आपण करतोच. ज्यात ताक, लस्सी, आईस्क्रीम, सरबत या पदार्थांचा समावेश आहे.  ताक हे थंड पेय आपण उन्हाळ्यात हमखास पितो. ताकामध्ये दह्याची मात्रा खूप कमी आणि पाण्याची मात्रा जास्त असते. ताक प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

ताक पचनशक्ती सुधारण्याचे कार्य करते. कारण दह्यातील उत्तम बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक अॅसिड पचनसंस्था सुधारते. ज्यामुळे आतड्यांना आराम मिळतो. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते. ताकाचे देखील विविध प्रकार आहेत.ज्यात मसाला ताक हे पेय महाराष्ट्रात फार फेमस आहे. चला तर मग कमी साहित्यात झटपट मसाला ताक कसे बनवायचे ते पाहूयात(Masala Chaas with homemade Chaas Masala ).

मसाला ताक बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१ लिटर ताक

1/4 टीस्पून काळी मिरी पावडर

पुदिन्याची पाने

कोथिंबीर

हिरवी मिरची

आले

आता रविवारी घरीच करा ढाबा स्टाइल मसालेदार ग्रेव्ही पनीर भूर्जी, चमचमीत बेत जमणारच

1/4 टीस्पून चाट मसाला

1/4 टीस्पून काळे मीठ

मसाला ताक बनवण्यासाठी लागणारं साहित्य

सर्वप्रथम, एका मिक्सरच्या भांड्यात आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिन्याची पाने घेऊन त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट करत असताना त्यात थोडे पाणी मिक्स करा. जेणेकरून पेस्ट चांगली तयार होईल. आता दुसरीकडे एका भांड्यात एक लिटर बटर मिल्क म्हणजेच ताक घ्या, त्यात तयार केलेली हिरवी पेस्ट टाका.

भजी तर आवडतात पण बेसन पचत नाही? करा ज्वारीची कुरकुरीत कांदा भजी, खा बिंधास्त पोटभर

त्यानंतर त्यात काळी मिरी पावडर, काळे मीठ, चाट मसाला घालून बीटरने मिक्स करा. आपण आपल्या चवीनुसार मसाला अधिक घालू शकता. मिसळण्यासाठी, मिक्सरऐवजी बीटर वापरण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे मसाला ताक अधिक चवीला उत्तम लागेल. अशा प्रकारे झटपट, कमी साहित्यात अस्सल मसाले ताक पिण्यासाठी रेडी.

टॅग्स :समर स्पेशलअन्न