Join us  

Cooking Tips: भाजीत मसाले घालताना द्या लहानसा ट्विस्ट, नेहमीची भाजी होईल चमचमीत- हॉटेलच्या भाज्यांपेक्षा भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2022 4:25 PM

How To Make Food More Delicious And Tasty: भाजीत तिखट, मीठ, मसाले घालताना या काही ट्रिक्स वापरून बघा, नेहमीचीच भाजी पण नक्कीच तिची चव बदलल्यासारखी वाटेल..(when to add spices in food)

ठळक मुद्देभाज्या करताना मसाला थोडा वेगळ्या पद्धतीने घाला. भाज्यांची चव नक्कीच बदलल्यासारखी वाटेल.

दररोज तेच ते वरण- भात, भाजी- पोळी असं जेवण दिलं तर जेवणारे आणि स्वयंपाक (cooking) करणारे दोघेही कंटाळून जातात. त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन तर अगदी वैताग येऊन जातो. त्यात काहीतरी चेंज हवा असतो, तरच जेवणाची मजा वाढत जाते. भाजीच्या चवीत (tips to make food more delicious) बदल करायचा म्हणजे रोज मसालेदार भाज्या करून खायच्या असं मुळीच नाही. तुमच्या रोजच्या जेवणातल्या अगदी साध्याच भाज्या करा, फक्त त्या करताना मसाला (when to add masala or spices in gravy) थोडा वेगळ्या पद्धतीने घाला. भाज्यांची चव नक्कीच बदलल्यासारखी वाटेल आणि त्या आणखी चवदार होतील. 

 

मसाला घालताना थोडा असा बदल करून बघा...१. भाज्यांना वाफ आली की त्यानंतर आपण त्यात तिखट आणि इतर मसाले घालतो. आता तिखट घालण्याच्या पद्धतीत थोडा बदल करून बघा. फोडणी तडतडली की आपण त्यात हळद घालतो. हळद घातली की लगेच थोडं लाल तिखट टाकून द्या. तिखट तेलात छान परतल्या जातं आणि त्यामुळे भाजीच्या चवीत एक प्रकारचा मस्त खमंगपणा येतो. फक्त असं करताना तिखट जळणार नाही याची काळजी घ्या.२. तिखट घालण्याऐवजी भाजीत किंवा वरणात कधी कधी लाल मिरची कुटून घाला. मिरची कुटल्यावर लगेचच भाजीत टाकली तर भाजीची चव निश्चतच बदलते.

 

३. कधी कधी लाल तिखट, लाल मिरची यांच्या ऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करा. हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर एकसोबतच खलबत्त्यात घालून कुटा आणि हे हिरवं तिखट भाजीत किंवा वरणात घाला. मिरचीचा ताजा- ताजा तिखटपणा आणि कोथिंबीरीचा हलकासा सुवास पदार्थाची चव अधिक खुलवतो.४. नेहमीच्या भाज्यांमध्ये आपण मिरेपूडचा जास्त वापर करत नाही. पण कधी तरी आपल्या रोजच्या भाज्यांमध्येही मिरेपूड टाकून बघा. भाजीला खास चव आणायची असेल तर बाजारातली तयार मिरेपूड वापरू नका. थोडेसे मिरे एका लहानशा खलबत्त्यात घालून कुटा आणि ती भाजीत किंवा वरणात टाका.

 

५. बऱ्याचजणी तिखट, मीठ आणि काळा मसाला भाजीत एकत्रच टाकून देतात. पण असं करू नका. लाल तिखट आणि मीठ टाकून झाल्यानंतर भाजीला वाफ येऊ द्या आणि जेव्हा भाजी शिजत आली असेल आणि तुम्ही गॅस बंद करणार असाल त्याच्या ५ मिनिटे आधी भाजीत काळा मसाला किंवा गरम मसाला टाका. यामुळे भाजीला एक खास फ्लेवर येतो. ६. ग्रेव्ही असणारी मसालेदार भाजी करणार असाल तर त्या भाजीमध्ये लसूण, टोमॅटो प्युरी लागतेच. हे दोन्ही पदार्थ कच्चे वापरू नका. लसूण आधी भाजून घ्या आणि नंतर त्याची पेस्ट करून टाका. तसेच टोमॅटो देखील आधी भाजून घ्या. भाजून थंड झाल्यावर नंतर त्याची प्युरी करा आणि ती भाजीमध्ये वापरा. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती