Join us  

१ वाटी तांदूळ वापरून करा चविष्ट, चवदार मसाला खिचडी, सोपी रेसेपी, जेवणाची वाढेल रंगत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 1:12 PM

Masala Khichdi Recipe : खिचडीमध्ये तांदळाबरोबर डाळींचाही समावेश असल्यानं ती चवीला छान लागते तितकीच पौष्टीकही असते.

भारतीय घरांमध्ये प्रत्येकाच्याच दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भात असतोच. डाळ भात, सांबार भात, डाळ खिचडी, पूलाव, बिर्याणी, टोमॅटो राईस, कर्ड राईस असे वेगवेगळे पदार्थ आवडीनुसार बनवले जातात. नेहमी नेहमी त्याच त्याच प्रकारचे पदार्थ खाऊन कंटाळा आला  की काहीतरी नवीन चटपटीत खावंसं वाटतं. म्हणूनच (Masala Khichdi Recipe) गरमागरम मसालेदार खिचडी बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. खिचडीमध्ये तांदळाबरोबर डाळींचाही समावेश असल्यानं ती चवीला छान लागते तितकीच पौष्टीकही असते. मसालेदार खिचडी बनवण्याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. (How to make masala khichdi)

मसाला खिचडी बनवण्याची रेसेपी

1) कुकरच्या भांड्यात २ चमचे तेल आणि १ चमचा तूप घालून गरम होऊ द्या. १ टीस्पून जिरे घालून तडतडू द्या. २ लाल मिरच्या घाला. 5-6 चिरलेल्या लसूण पाकळ्या घालून एक मिनिट परतून घ्या. २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.

2) 2 चिरलेले कांदे घाला आणि ते पारदर्शक होईपर्यंत तळा, 1 टीस्पून आलं- लसूण पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत शिजवा. 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने पावडर, 1/2 टीस्पून जिरे पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. मसाला शिजवण्यासाठी 1/4 कप पाणी चांगले मिसळा आणि २-३ मिनिटे शिजवा.

उरलेल्या शिळ्या भाताचे ५ मिनिटांत करा खमंग क्रिस्पी मेदू वडे, भाताची इन्स्टंट रेसिपी-चवीला भारी

3) १ कप भिजवलेली डाळ त्यात घाला. नंतर 1 कप भिजवलेले तांदूळ घाला. थोडी ताजी कोथिंबीर घाला. भांड्यात साहित्य मिसळा. 2.5 कप पाणी घाला.

4)  कुकरचे झाकण लावा आणि 3 शिट्ट्यां घेऊन शिजू द्या. शिजल्यावर वाफ निघेपर्यंत कुकरला विश्रांती द्या. कुकर उघडा आणि खिचडी मिक्स करा. 1 टीस्पून तूप आणि कोथिंबीर घालून गरम गरम खिचडी पापड, लोणच्यासह सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स