Join us  

Masala Paan Recipe: विकतच्यासारखं मसाला पान घरीच खायला मिळालं तर.... ही घ्या रेसिपी, घरीच लावा मसाला पान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2022 4:39 PM

How To Make Masala Paan: मसाला पान करण्याची ही बघा भन्नाट रेसिपी... एकदा हे घरी लावलेलं पान खाल्लं तर बाहेर जाऊन मसाला पान खाणं विसरून जाल.

ठळक मुद्देआता टपरीवर जाऊन मसाला पान खाण्याची गरजच पडणार नाही. ही बघा एक सोपी रेसिपी.

रात्रीच्या वेळी मस्त जेवण झालं की हमखास मसाला पान (masala paan) खावंसं वाटतंच.. एवढंच काय जेवण झाल्यानंतर चक्कर मारायला घराबाहेर पडलं तरी सोबतीला मसाला पान असतं तर.... अशी आठवण हमखास झाल्याशिवाय राहात नाही.. पान खाण्याचा शौकिन नसणारा क्वचितच एखादा सापडेल. पुरुषांना घराबाहेर पडून कधीही पान खाणं शक्य आहे.. पण महिलांना अजूनही एकट्याने टपरीवर जाऊन पान घेता येत नाही.. म्हणूनच तर आता टपरीवर जाऊन मसाला पान खाण्याची गरजच पडणार नाही. ही बघा एक सोपी रेसिपी. असं झकास पान होईल की विकतचं मसाला पान खाणं विसरून जाल.

 

सणवार असले की घरी हमखास विड्याचं पान (vidyacha paan) खाल्लं जातं. एखाद्या छोट्या घरगुती कार्यक्रमासाठी जेवायला पाहुणे येणार असतील, तरी त्यांच्यासाठी जेवणानंतर आपण मसाला पानं आणून ठेवतोच.. एकंदरीतच काय की मसाला पान हे जवळपास सगळ्यांच्याच आवडीचं. विकत आणायला गेलं तर २५ ते ३० रुपयांना एक मसाला पान मिळतं. एवढ्या पैशात तर आपण घरबसल्या कित्येक विडे लावू शकतो.. म्हणूनच तर बघा ही खास रेसिपी (masala paan recipe). ही रेसिपी यु ट्यूबच्या ''आपली आजी'' या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

विड्याचं पान खाण्याचे फायदे (Benefits of eating betel leaf)- विड्याचं पान किंवा नागवेलीचं पान अतिशय आरोग्यदायी आहे त्यामुळे आपल्याकडे बाळंतिणीलाही विड्याचं पान खाण्याचा सल्ला दिला जातो. - या पानात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हाडांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमितपणे विडा खावा.- विड्याचं पान खाताना आपण त्यात लवंग, वेलची, बडिशेप, गुलकंद असे सगळे घटक टाकतो, हे सगळे घटक पचनासाठी आणि पोटाचे त्रास कमी करण्यासाठी महत्त्वाचे असतात.- वात आणि कफ दोष दुर करण्यासाठी विड्याचं पान उत्तम आहे.- विड्याच्या पानांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, खनिजे, ॲण्टी ऑक्सिडंट्स, फायबर हे घटकही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पान अतिशय पाचक मानलं जातं.

 

मसाला पान करण्यासाठी साहित्यविड्याची पानं, बडीसोप, टुथपिक, गुंजाची पानं, बारीक कापलेली सुपारी, विलायची, लवंग, टुटीफ्रुटी, लाल चेरी, सुकं खोबरं, रंगीत बडिशेप, गुलकंद, कात आणि चुना, काश्मिरी सुगंधी मसाला, पान चटणी, आस्मानताराकसं लावायचं मसाला पान?- सगळ्यात आधी पान धुवून, पुसून स्वच्छ कोरडी करून घ्या. त्याची देठे काढून टाका.- २ पानांचा विडा लावला जातो. दोन्ही पान एकमेकांवर ठेवा. पानाच्या उलट बाजूने विडा लावायचा असतो.- सगळ्यात आधी पानावर कात, चुना लावून घ्या. त्यानंतर पान चटणी लावा.- त्यानंतर गुलकंद टाकून ते पानावर थोडं पसरवून घ्या.- आता आपल्याकडचं सगळं साहित्य थोडं थोडं पानावर टाका.- सगळं टाकून झाल्यावर वरतून थोडासा काश्मिरी सुगंधी मसाला भुरभुरा.- त्याचा छान विडा बांधा. त्याला टुथपिक लावा आणि त्या टुथपिकमध्ये एक लालबुंद चेरी अडकवा.- सगळे विडे काचेच्य बाऊलमध्ये टाका. त्यावरून थोडा खोबऱ्याचा किस आणि थोड्या गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या की झालं विकतच्या सारखं मसाला पान घरच्या घरी तयार... 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य