Lokmat Sakhi >Food > घरीच करा हॉटेलसारखा चमचमीत मसाला पाव, तोंडाला चव आणणारी झटपट रेसिपी...

घरीच करा हॉटेलसारखा चमचमीत मसाला पाव, तोंडाला चव आणणारी झटपट रेसिपी...

Masala Pav Easy Snack Recipe : मधल्या वेळेत खाण्यासाठी करता येईल अशी चविष्ट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2023 10:06 AM2023-05-01T10:06:21+5:302023-05-01T10:10:02+5:30

Masala Pav Easy Snack Recipe : मधल्या वेळेत खाण्यासाठी करता येईल अशी चविष्ट रेसिपी...

Masala Pav Easy Snack Recipe : Make hotel-like sparkling masala pav at home, a mouth-watering instant recipe... | घरीच करा हॉटेलसारखा चमचमीत मसाला पाव, तोंडाला चव आणणारी झटपट रेसिपी...

घरीच करा हॉटेलसारखा चमचमीत मसाला पाव, तोंडाला चव आणणारी झटपट रेसिपी...

उन्हाळ्याचा दिवस मोठा असतो, त्यातही उन्हाने तोंडाला चव नसते अशावेळी आपल्याला ऊन उतरलं की छान काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी सतत बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा घरातच काही वेगळे पदार्थ केले तर? मुलांनाही या काळात शाळांना सुट्ट्या असल्याने जेवणाशिवाय मधल्या वेळेला काही ना काही खायला लागतं. अशावेळी सारखं वेगळं काय करायचं असा प्रश्न आपल्यााल पडतो. पाव ही मुलांच्या आवडीची गोष्ट, घरात पाव असेल तर झटपट अशी एक चविष्ट रेसिपी आपण करु शकतो. पोटभरीची आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही हटके रेसिपी करण्यासाठी घरात फार सामान असण्याचीही आवश्यकता नसते. हॉटेलमध्ये पावभाजी खायला गेलो की आपण आवर्जून ऑर्डर करतो असा मसाला पाव घरीच कसा करायचा ते पाहूया (Masala Pav Easy Snack Recipe)...

साहित्य -

१. पाव - ५ ते ६ 

२. पावभाजी मसाला - २ चमचे 

३. बटर - २ चमचे 

(Image : Google)
(Image : Google)

४. कांदा - १ 

५. टोमॅटो - १ 

६. बटाटा - १ उकडलेला 

७. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा 

८. गरम मसाला - अर्धा चमचा 

९. मीठ - चवीनुसार 

१०. लसूण चटणी - अर्धा चमचा 

११. कोथिंबीर - २ चमचे 

कृती - 

१. पावभाजी मसाला, गोडा मसाला, धणे-जीरे पावडर आणि मीठ एकत्र करायचे. 

२. तव्यावर बटर घालून त्यावर हा एकत्र केलेला मसाला घालायचा. 

३. त्यात लसूण चटणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळे तव्यावर एकत्र करुन घ्यायचे. 

४. पाव मध्यभागी कापून घ्यायचा आणि तव्यावर या मिश्रणावर दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचा. 

५. या मसाला लावलेल्या पावाच्या मध्यभागी उकडलेल्या बटाट्याचा स्लाईस, टोमॅटो स्लाईस आणि कांद्याचा स्लाईस ठेवायचा. 

६. या सॅलेडवर आवडीनुसार थोडं मीठ आणि चाट मसाला घालायचा. हा गरमागरम मसाला पाव खायला अतिशय छान लागतो. 

 

 

Web Title: Masala Pav Easy Snack Recipe : Make hotel-like sparkling masala pav at home, a mouth-watering instant recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.