Lokmat Sakhi >Food > नवरात्र स्पेशल : नेहमीची तीच ती साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात ? त्याच पारंपरिक साबुदाणा खिचडीला द्या हटके ट्विस्ट...

नवरात्र स्पेशल : नेहमीची तीच ती साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात ? त्याच पारंपरिक साबुदाणा खिचडीला द्या हटके ट्विस्ट...

2 New Type Of Sabudana Khichdi Recipe For Fasting : नेहमीच्या साबुदाणा खिचडीला थोडा ट्विस्ट देत साबुदाणा खिचडी आणखीन दोन नव्या पद्धतीने कशी बनवावी ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2023 12:47 PM2023-10-14T12:47:31+5:302023-10-14T13:10:23+5:30

2 New Type Of Sabudana Khichdi Recipe For Fasting : नेहमीच्या साबुदाणा खिचडीला थोडा ट्विस्ट देत साबुदाणा खिचडी आणखीन दोन नव्या पद्धतीने कशी बनवावी ते पाहूयात...

Masala Sabudana Khichdi, Sabudana Khichdi in green paste, 2 New Type Of Sabudana Khichdi Recipe For Fasting | नवरात्र स्पेशल : नेहमीची तीच ती साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात ? त्याच पारंपरिक साबुदाणा खिचडीला द्या हटके ट्विस्ट...

नवरात्र स्पेशल : नेहमीची तीच ती साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात ? त्याच पारंपरिक साबुदाणा खिचडीला द्या हटके ट्विस्ट...

उपवास म्हटला की तो उपवासाच्या काही खास पदार्थांखेरीज पूर्ण होऊच शकत नाही. आपल्याकडे एक म्हण फार लोकप्रिय आहे, उपवासा दिवशी दुप्पट खाशी. उपवास करणाऱ्यांसाठी नवरात्र हा सण म्हणजे एक पर्वणीच असते. या नऊ दिवसांच्या उपवासात वेगवेगळे उपवासाचे पदार्थ खाण्याची चांगळचं असते. उपवासांत सगळ्यांत जास्त प्रमाणावर व आवडीने खाल्ला जाणारा एकमेव पदार्थ म्हणजे साबुदाणा. कोणताही उपवास हा साबुदाण्याचा (Sabudana Khichdi - A Navratri Special treat, Fasting Food, Sago Khichdi) एक तरी पदार्थ खाल्ल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर, थालीपीठ, बर्फी, डोसा, इडली असे अनेक उपवासाचे पदार्थ आपण खातोच(Sabudana Khichdi with new twist).

उपवासाला झटपट होणारी साबुदाण्याची खिचडी ही सगळ्यांच्याच आवडीची असते. उपवास असला की साबुदाण्याची खिचडी ही झालीच पाहिजे. बनवायला सोपी, खायला चविष्ट, झटपट होणारी अशी ही साबुदाण्याची पांढरी खिचडी (2 New Type Of Sabudana Khichdi Recipe For Fasting) आपण वर्षानुवर्षे खात आलो आहोत. यंदाच्या नवरात्रीच्या उपवासाला आपण या नेहमीच्या साबुदाणा खिचडीला थोडा ट्विस्ट देत साबुदाणा खिचडी आणखीन दोन नव्या पद्धतीने कशी बनवावी ते पाहूयात.         

साहित्य :- 

१. साबुदाणा - १/२ किलो (पाण्यांत भिजवून घेतलेला)
२. मीठ - चवीनुसार 
२. साखर - २ टेबलस्पून 
३. शेंगदाणे किंवा दाण्याचा कूट - २ कप (भाजून घेतलेले शेंगदाणे)
४. साजूक तूप - ४ टेबलस्पून 
५. काजू - १/२ कप
६. बदाम - १/२ कप
७. जिरं - १ टेबलस्पून 
८. बटाटे - २ (उकडवून त्याचे लहान तुकडे केलेले)
९. लाल तिखट मसाला - २ टेबलस्पून 
१०. खोबरं - १ कप (किसून घेतलेलं)
११. कोथिंबीर - १ कप 
१२. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ 
१३. लिंबाचा रस - २ टेबलस्पून 

उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...

उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...

कृती :- 

१. लाल रंगाची साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठीची कृती (How To Make Masala Sabudana Khichdi) :- 

१. एका कढईमध्ये साजूक तूप घेऊन त्यात काजू व बदामाचे तुकडे घालून ते तुपात खमंग भाजून घ्यावेत. त्यानंतर त्यात जिरे, उकडलेल्या बटाट्याचे लहान तुकडे, शेंगदाणे घालून ते व्यवस्थित परतून घ्यावेत. आता या मिश्रणात लाल तिखट मसाला घालून सगळे जिन्नस या मसाल्यात मिक्स करून परतून घ्यावेत. त्यानंतर यात भिजवलेला साबुदाणा, दाण्याचे कूट, साखर, मीठ घालून घ्यावे. आता २ ते ३ मिनिटे या भांड्यावर झाकण ठेवून वाफेवर खिचडी शिजवून घ्यावी. सगळ्यात शेवटी यात किसलेलं खोबर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ती मिक्स करुन घ्यावी. त्यानंतर वरून लिंबाचा रस चवीनुसार घालावा व साबुदाणा खिचडी खाण्यासाठी सर्व्ह करावी.

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

 

२. हिरव्या रंगाची साबुदाणा खिचडी करण्याची कृती (Sabudana Khichdi in green paste) :- 

२. एका मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, किसलेलं खोबर घेऊन त्याचे वाटण तयार करावे. एका कढईमध्ये साजूक तूप घेऊन त्यात काजू व बदामाचे तुकडे घालून ते तुपात खमंग भाजून घ्यावेत. त्यानंतर त्यात जिरे, उकडलेल्या बटाट्याचे लहान तुकडे, शेंगदाणे घालून ते व्यवस्थित परतून घ्यावेत. आता या मिश्रणात तयार करून घेतलेले हिरवे वाटण घालावे. हिरवे वाटण घातल्यानंतर यात भिजवलेला साबुदाणा, दाण्याचे कूट, साखर, मीठ घालून घ्यावे. आता २ ते ३ मिनिटे या भांड्यावर झाकण ठेवून वाफेवर खिचडी शिजवून घ्यावी. सगळ्यात शेवटी यात किसलेलं खोबर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ती मिक्स करुन घ्यावी. त्यानंतर वरून लिंबाचा रस चवीनुसार घालावा व साबुदाणा खिचडी खाण्यासाठी सर्व्ह करावी.  

कोण म्हणतं साबुदाणा नको, खाऊन तर पाहा साबुदाण्याची बर्फी - उपवासासाठी स्पेशल एनर्जीचा डोस...

अशाप्रकारे नेहमीच्या वापरातले पदार्थ वापरून आपण साबुदाण्याच्या खिचडीचे दोन नवीन प्रकार झटपट तयार करु शकतो.

Web Title: Masala Sabudana Khichdi, Sabudana Khichdi in green paste, 2 New Type Of Sabudana Khichdi Recipe For Fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.