Join us  

मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात नारळ फोडण्याची १ सोपी ट्रिक, नारळ फोडण्याचं अवघड काम होईल सोपं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2023 6:19 PM

Do you struggle to remove coconut from its shell? Chef Vikas Khanna's hack might help : नारळ फोडता येत नाही, १ सोपी ट्रिक- ओल्या नारळाचे पदार्थ करा झटपट

'खोबर' हा आपल्या रोजच्या जेवणातला एक मुख्य जिन्नस आहे. कोणताही पदार्थ बनवताना आपण त्या पदार्थात किसलेला किंवा बारीक तुकडे करून घेतलेला नारळ घालतो. ओलं असो किंवा सुकं, किसून किंवा त्याची पेस्ट तयार करून या खोबऱ्याचा वापर जेवणात केला जातो. किसलेलं खोबर पदार्थात घातलं की त्याची चव अधिक चांगली लागते. पदार्थात खोबर घातल्यावर त्या पदार्थाच्या चवीत भर पडत असली तरीही नारळ फोडून, त्याला खवून त्याचा किस काढणे हे खूप कठीण काम असते. 

आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना नारळ फोडायचा व त्याचे खोबरे खवायचे या सगळ्या गोष्टींचा अतिशय कंटाळा येतो. काही महिला तर नारळ फोडण्याची ही महत्वाची जबाबदारी घरातील पुरुष मंडळींवरच सोपवून मोकळ्या होतात. असे असले तरीही नारळ फोडल्यानंतर तो खवायचा कसा हा देखील खूप मोठा प्रश्नच असतो. काहीजण या नारळाची अख्खी करवंटी काढून घेऊन त्याचे लहान लहान तुकडे करून घेतात. याचबरोबर काहीजण नारळाची करवंटी घेऊन ती खवून त्याचा खोबऱ्याचा किस पाडतात. परंतु आता नारळ फोडण्याचे टेंशन सोडा मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी नारळ करवंटी पासून वेगळा करून त्याचा किस करण्याची एक सोपी पद्धत इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे(Masterchef Pankaj Bhadauria Shares Surprising Hack To Remove Coconut From Shell).

नारळ फोडण्याची एक सोपी ट्रिक :- 

नारळाला त्याच्या बाहरेच्या करवंटीपासून वेगळं करण हा गृहिणींसाठी एक मोठा टास्कच असतो. यासाठी एक सोपी ट्रिक फॉलो करून आपण सहज करवंटीपासून खोबर वेगळं करु शकतो. 

१. सर्वप्रथम नारळ फोडून त्याचे दोन भाग करुन घ्यावेत. 

२. आता अनुक्रमे एक - एक नारळाची करवंटी घेऊन ती गॅसच्या मंद आचेवर ठेवून बाहेरून संपूर्णपणे काळी होईपर्यंत गरम करुन घ्यावी. करवंटी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवताना त्याचा टणक भाग आचेवर ठेवावा. जेणेकरुन ते बाहेरचे टणक आवरण गॅसच्या आचेवर संपूर्णपणे गरम होईल. 

गरमागरम वरणभात आणि तोंडी लावायला जवसाची चटणी, पावसाळ्यात ही पारंपरिक चटणी पोटाला बरी...

३. आता ही गॅसवर ठेवलेली करवंटी संपूर्णपणे गरम झाली व बाहेरून काळी झालेली दिसली की चिमट्याच्या मदतीने ती करवंटी उचलून एका गार पाण्याच्या बाऊलमध्ये सोडावी. 

४. ही गरम करून घेतलेली करवंटी थंड पाण्यात सोडल्यास, गरम वातावरणातून थंड पाण्यात सोडल्याने आकुंचन पावेल. बाहेरचे टणक आवरण आकुंचन पावल्याने टणक करवंटीपासून खोबरे वेगळे होण्यास सुरुवात होईल. यामुळे खोबरे करवंटीपासून वेगळे होऊन चटकन बाहेर निघून येईल. 

लोणच्याची बरणी खूपच तेलकट झाली आहे ? एक सोपी ट्रिक तेलकटपणा व मसाल्यांचे डाग होतील गायब...

टोमॅटो महाग झाले तर आंबटपणासाठी वापरा ६ गोष्टी, टोमॅटोचा रसरशीतपणा नाही, काम भागेल...

या सोप्या पद्धतीचा वापर करुन आपण अगदी सहजरीत्या चटकन करवंटी पासून खोबरे वेगळे करु शकतो. असे खोबरे काढून आपण किसू शकतो किंवा त्याचे बारीक - बारीक तुकडे करून फ्रिजरमध्ये स्टोअर करुन ठेवू शकतो.

टॅग्स :अन्न