Lokmat Sakhi >Food > फक्त ३ सोप्या स्टेप्स, मातीची नवी भांडी स्वयंपाकासाठी होतील परफेक्ट तयार, करा मातीच्या भांड्यात स्वयंपाक...

फक्त ३ सोप्या स्टेप्स, मातीची नवी भांडी स्वयंपाकासाठी होतील परफेक्ट तयार, करा मातीच्या भांड्यात स्वयंपाक...

How to season claypot for first use : MasterChef Pankaj Bhadouria Share's How to season claypot for first use : How to season clay pots for a perfect cooking experience : मातीची भांडी सिझन कशी करावीत माहित नाही ? फक्त ३ सोप्या स्टेप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2024 06:17 PM2024-12-03T18:17:02+5:302024-12-03T18:18:13+5:30

How to season claypot for first use : MasterChef Pankaj Bhadouria Share's How to season claypot for first use : How to season clay pots for a perfect cooking experience : मातीची भांडी सिझन कशी करावीत माहित नाही ? फक्त ३ सोप्या स्टेप्स...

MasterChef Pankaj Bhadouria Share's How to season claypot for first use How to season clay pots for a perfect cooking experience How to season claypot for first use | फक्त ३ सोप्या स्टेप्स, मातीची नवी भांडी स्वयंपाकासाठी होतील परफेक्ट तयार, करा मातीच्या भांड्यात स्वयंपाक...

फक्त ३ सोप्या स्टेप्स, मातीची नवी भांडी स्वयंपाकासाठी होतील परफेक्ट तयार, करा मातीच्या भांड्यात स्वयंपाक...

पूर्वीच्या काळात स्वयंपाकासाठी शक्यतो मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे. परंतु बदलत्या काळानुसार मातीच्या भांड्यांचा वापर करण्याची पद्धत मागे पडत गेली. आता सध्या आपण स्टेनलेसस्टील, काचेची भांडी, जर्मन अशा वेगवेगळ्या धातूंपासून बनलेल्या भांड्यांचा वापर करतो. असे असले तरीही मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही अन्नपदार्थात फार मोठ्या प्रमाणात राखले जाते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मातीच्या भांड्यात असणारे लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने सगळीकडे पसरण्यास मदत करतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्त्व सुरक्षित राहतात(How to season claypot for first use).

मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे अनेक असले तरीही त्यात स्वयंपाक करण्यापूर्वी ते वापरावं कसं (How to season clay pots for a perfect cooking experience) याबद्दल देखील योग्य माहिती असणे गरजेचे आहे. या मातीच्या भांड्यांना वेळच्यावेळी धुवून, पुसून स्वच्छ केले नाही तर अशी मातीची भांडी लवकर खराब होतात. ही भांडी कालांतराने कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ बनवण्यायोग्य राहत नाही. बाजारांतून मातीचे भांडे विकत आणल्यावर फक्त पाण्याने स्वच्छ धुवून त्यात स्वयंपाक करणे ही चुकीची पद्धत आहे. मातीच्या भांडीत स्वयंपाक करण्यापूर्वी या भांड्यांना लोखंडाच्या कढई आणि तव्याप्रमाणे सिझन करावे लागते. पण मातीच्या भांड्यांना सिझन कसे करावे याची प्रक्रिया बऱ्याचजणींना माहित नसते. यासाठी मातीची भांडी विकत आणल्यावर ती स्वयंपाक योग्य तयार करण्यासाठी सिझन करण्याची पूर्ण पद्धत सुप्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे(MasterChef Pankaj Bhadouria Share's How to season claypot for first use).

नवीन मातीची भांडी सिझन कशी करावीत ? 

बाजारांतून नवी मातीची भांडी विकत आणल्यावर ती लगेच फक्त पाण्याने स्वच्छ धुवून वापरणे योग्य नाही. यासाठी मातीची भांडी वापरण्याअगोदर स्वयंपाक योग्य करण्यासाठी आधी सिझन करावी लागतात. मातीच्या भांड्यांना सिझन कसे करावी याची पद्धत सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी सोप्या ३ स्टेप्समध्ये समजावून सांगत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहेत.

स्टेप १ :- मातीच भांड नवीन विकत आणल्यावर ते सिझन करण्यासाठी सर्वातआधी पाण्याने स्वच्छ धुवून मग रात्रभर त्यात पाणी भरुन ठेवून द्यावे.

स्टेप २ :- दुसऱ्या दिवशी मातीच्या भांड्यातून पाणी ओतल्यावर ३ ते ४ तास हे भांड संपूर्णपणे व्यवस्थितपणे सुकवून घ्यावे. 

रताळं उकडलं की लगदा होतो- पचपचीत लागते? १ भन्नाट ट्रिक, २ मिनिटांत रताळे उकडेल...


कांदा चिरताना डोळ्याला पाण्याच्या धारा? ८ टिप्स, कांदा चिरताना डोळ्यात एक थेंब पाणी येणार नाही..

स्टेप ३ :- भांड संपूर्णपणे व्यवस्थित सुकल्यानंतर त्या मातीच्या भांड्याला आतून - बाहेरून मोहरीचे तेल लावून घ्यावे. त्यानंतर हे तेल लावून घेतलेलं मातीच भांड ५ ते ७ मिनिटे गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावे. 

अशाप्रकारे आपण फक्त या तीन सोप्या स्टेप्समध्ये नवीन विकत आणलेलं मातीच भांड सिझन करु शकतो. 

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. मातीचा तवा जर काचऱ्या इत्यादी साठी वापरणार असाल,किंवा टोप,कढई अशी भांडी, चोवीस तास बुडवून झाल्यावर, धुवून पुसून कोरडी करावी आणि त्यावर तेल घालून मोठा कांदा लाल होपपर्यंत भाजून घ्यावा. 

२. दुसरे महत्वाचे म्हणजे भांडे कधीही गॅसवर तेल घालूनच गरम करायचे. आधी गरम करू नये. ती फुटू शकतात.

Web Title: MasterChef Pankaj Bhadouria Share's How to season claypot for first use How to season clay pots for a perfect cooking experience How to season claypot for first use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.