हिवाळ्यात गरमागरम चहा पिण्याची इच्छा कधीही होते. चहाबरोबर खायला गरमागरम कचोरी, वडे काहीतरी असेल तर यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नसू शकतो. हिवाळ्यात बाजारात हिरवेगार मटार दिसतात. भाजी, पुलाव, खिचडी करताना मटार वापरले जातात. मटार या दिवसात स्वस्तसुद्धा मिळतात. (Cooking Tips & Hacks) संध्याकाळच्यावेळी चहाबरोबर खायला मटार कचोरी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. मटार कचोरी चवीला खूप खमंग आणि चटपटीत लागते. पाहूया मटार कचोरीची रेसेपी (Matar ki kachori recipe crispy matar ki kachori winter food)
मटार कचोरीसाठी लागणारं साहित्य
हिरवे वाटाणे - २ कप
मैदा - २ कप
आले चिरून - १ टीस्पून
हिरवी मिरची बारीक चिरून - ३
हिंग - चिमूटभर
तेल
मीठ
कृती
१) मटर कचोरी बनवण्यासाठी प्रथम एक भांडं घ्या आणि त्यात पीठ चाळून घ्या. आता पिठात दोन चमचे तेलाचे मोहन घाला आणि चवीनुसार मीठ घालून दोन्ही हातांनी चांगले मिक्स करा. यानंतर थोडे थोडे कोमट पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.
२) आता पीठ झाकून 20 ते 30 मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर स्टफिंग तयार करण्याचे काम सुरू करा. सर्वप्रथम गॅसवर पाणी गरम करून त्यात मटार टाकून चांगले उकळून घ्या. मटार 5-6 मिनिटांत चांगले उकळतील.
३) यानंतर गॅस बंद करा आणि मटारमधील सर्व पाणी काढून घ्या. यानंतर उकडलेले वाटाणे, आले आणि हिरवी मिरची घेऊन मिक्सरमध्ये टाकून खरखरीत पेस्ट तयार करा. या मिश्रणाची बारीक पेस्ट बनवू नका. आता कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग टाका आणि ठेचा.
४) यानंतर त्यात तयार मटार पेस्ट टाका आणि वरून मीठ टाका आणि मिक्स करा. साधारण पाच मिनिटे मध्यम आचेवर तळून घ्या आणि गॅस बंद करा. यानंतर, सारण थंड होण्यासाठी ठेवा.
५) कचोरीसाठी कणिक आणि सारण तयार आहे. आता कढईत तेल तापायला ठेवा. दरम्यान, पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्या आणि त्याचे छोटे गोळे करा. यानंतर एक गोळा घेऊन पुरीसारखा लाटून घ्या. तयार सारण मधोमध ठेवा आणि पुरी चारही बाजूंनी वरती वळवून पुरण बंद करा. आता त्यांना गोल फिरवा. त्याचप्रमाणे एक एक करून सर्व कचोऱ्या तयार करा.
थंडीत खायला पौष्टीक मऊ लुसलुशीत बाजरीची भाकरी; सोपी पद्धत वापरून करा परफेक्ट भाकरी
६) कचोऱ्या तयार होईपर्यंत कढईतील तेलही चांगले तापलेले असेल. यानंतर तव्याच्या क्षमतेनुसार त्यात कचोऱ्या तळण्यासाठी ठेवाव्यात. आता ते दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत तळा. या दरम्यान कचोऱ्या मधून मधून फिरवत राहा. आता कचोऱ्या एका प्लेटमध्ये काढा. अशा प्रकारे तुमची स्वादिष्ट गरमागरम मटार कचोरी तयार आहे. हे नाश्त्यात किंवा दिवसभरात केव्हाही स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकते. चटणी, टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.