मटारचे कोवळे, टपोरे, हिरवेगार दाणे पाहिले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते खाण्याचा मोह होतो. असे कोवळे दाणे वर्षातून दोन ते तीन महिनेच उपलब्ध असतात. त्यामुळे ते मिळतात तोपर्यंत भरपूर खाऊन घ्यावेत, कारण आरोग्याच्या दृष्टीनेही ते अतिशय फायदेशीर ठरतात. हाडांसाठी मटार उपयुक्त आहे. शिवाय त्यात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनासाठीही उत्तम असतात आणि शिवाय जे लोक वेटलॉससाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठीही उपयुक्त ठरतात. म्हणूनच आता मटारपासून अतिशय चवदार आणि तेवढेच हेल्दी मटार लच्छा पराठे (super yummy and tasty matar lachcha paratha) कसे करायचे, ते पहा..
मटार लच्छा पराठा रेसिपी
ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या seemassmartkitchen या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
२ कप मटारचे दाणे
२ ते ४ टेबलस्पून बेसन
आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट
अर्धा टीस्पून हिंग
अर्धा टिस्पून हळद
धने- जिरेपूड चवीनुसार
गरम मसाला चवीनुसार
थोडासा ब्रेड चेहऱ्यालाही लावून पहा.. त्वचेला होतील ३ भन्नाट फायदे, बघा नेमका कसा लावायचा
अर्धा टेबलस्पून तेल
पराठ्यांना लावायला तूप
अर्धे लिंबू, कोथिंबीर
चवीनुसार मीठ
आणि पराठ्यांसाठी मळलेली कणिक
रेसिपी
१. मटारचे दाणे मिक्सरमधून वाटून घ्या. अगदी बारीक पेस्ट नको. थोडे जाडेभरडे असावेत.
२. गॅसवर कढई तापायला ठेवा. त्यात तेल टाका.
३. तेल टाकल्यानंतर आलं- लसूण- मिरची पेस्ट परतून घ्या. त्यात हिंग आणि हळद घाला.
४. त्यानंतर बेसनपीठ टाकून ते देखील परतून घ्या.
५. मटारचे वाटलेले दाणे टाका. चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाकून सगळं मिश्रण एकदा परतून घ्या. मिश्रण थोडंसं घट्ट झालं की गॅस बंद करा आणि मग त्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि अर्धे लिंबू पिळा. हे मिश्रण थंड होऊ द्या.
६. मळलेल्या कणकेचा एक लहानसा गोळा घ्या. त्याची पोळी लाटा. त्या पोळीवर थोडी कणिक भुरभुरा.
७. आता आपण केलेलं पराठ्याचं सारण त्यावर पसरवून टाका. पोळीचा रोल करा. वरतून उभा काप देऊन त्याचे २ भाग करा.
पोटावरची- हिप्सवरची चरबी वाढली? शिल्पा शेट्टी सांगतेय ३ जबरदस्त व्यायाम, करून बघा
८. हे दोन्ही भाग आता गोलाकार गुंडाळा. वरतून- खालून पीठ लावा आणि त्याचा पराठा लाटा.
९. तूप लावून तव्यावर खरपूस भाजून घेतला की गरमागरम मटार लच्छा पराठा तयार.