Join us  

मटार लच्छा पराठा! चवीला एकदम भारी, थंडीत करून बघाच हा गरमागरम बेत, पाहा रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 1:42 PM

Matar Lachcha Paratha Recipe: सध्या मटारच्या शेंगा बाजारात भरपूर प्रमाणात आल्या आहेत. त्यामुळे ही टेस्टी रेसिपी आता लवकरच करून बघा..

ठळक मुद्देमटारपासून अतिशय चवदार आणि तेवढेच हेल्दी मटार लच्छा पराठे कसे करायचे, पाहा रेसिपी 

मटारचे कोवळे, टपोरे, हिरवेगार दाणे पाहिले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते खाण्याचा मोह होतो. असे कोवळे दाणे वर्षातून दोन ते तीन महिनेच उपलब्ध असतात. त्यामुळे ते मिळतात तोपर्यंत भरपूर खाऊन घ्यावेत, कारण आरोग्याच्या दृष्टीनेही ते अतिशय फायदेशीर ठरतात. हाडांसाठी मटार उपयुक्त आहे. शिवाय त्यात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनासाठीही उत्तम असतात आणि शिवाय जे लोक वेटलॉससाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठीही उपयुक्त ठरतात. म्हणूनच आता मटारपासून अतिशय चवदार आणि तेवढेच हेल्दी मटार लच्छा पराठे (super yummy and tasty matar lachcha paratha) कसे करायचे, ते पहा..

मटार लच्छा पराठा रेसिपीही रेसिपी इन्स्टाग्रामच्या seemassmartkitchen या पेजवर शेअर करण्यात आली आहे.साहित्य२ कप मटारचे दाणे२ ते ४ टेबलस्पून बेसनआलं, लसूण आणि मिरचीची पेस्टअर्धा टीस्पून हिंग

अर्धा टिस्पून हळदधने- जिरेपूड चवीनुसारगरम मसाला चवीनुसार

थोडासा ब्रेड चेहऱ्यालाही लावून पहा.. त्वचेला होतील ३ भन्नाट फायदे, बघा नेमका कसा लावायचाअर्धा टेबलस्पून तेलपराठ्यांना लावायला तूपअर्धे लिंबू, कोथिंबीरचवीनुसार मीठ आणि पराठ्यांसाठी मळलेली कणिक

 

रेसिपी १. मटारचे दाणे मिक्सरमधून वाटून घ्या. अगदी बारीक पेस्ट नको. थोडे जाडेभरडे असावेत.

२. गॅसवर कढई तापायला ठेवा. त्यात तेल टाका.

३. तेल टाकल्यानंतर आलं- लसूण- मिरची पेस्ट परतून घ्या. त्यात हिंग आणि हळद घाला.

४. त्यानंतर बेसनपीठ टाकून ते देखील परतून घ्या.

५. मटारचे वाटलेले दाणे टाका. चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाकून सगळं मिश्रण एकदा परतून घ्या. मिश्रण थोडंसं घट्ट झालं की गॅस बंद करा आणि मग त्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि अर्धे लिंबू पिळा. हे मिश्रण थंड होऊ द्या.

 

६. मळलेल्या कणकेचा एक लहानसा गोळा घ्या. त्याची पोळी लाटा. त्या पोळीवर थोडी कणिक भुरभुरा.

७. आता आपण केलेलं पराठ्याचं सारण त्यावर पसरवून टाका. पोळीचा रोल करा. वरतून उभा काप देऊन त्याचे २ भाग करा.

पोटावरची- हिप्सवरची चरबी वाढली? शिल्पा शेट्टी सांगतेय ३ जबरदस्त व्यायाम, करून बघा

८. हे  दोन्ही भाग आता गोलाकार गुंडाळा. वरतून- खालून पीठ लावा आणि त्याचा पराठा लाटा.

९. तूप लावून तव्यावर खरपूस भाजून घेतला की गरमागरम मटार लच्छा पराठा तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.