Join us  

वाटीभर मटारची करा कुरकुरीत भजी; बाहेरुन खमंग आतून मऊ मस्त, चहाबरोबर खा गरमागरम मटार भजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 12:35 PM

Matar Pakora Recipe (Matar Bhajji, Matar pakoda ksa kartat) : हिवाळ्याच्या दिवसांत ताजे मटार खाण्याची मजा काही वेगळीच.

हिवाळ्याच्या (Winter Special Recipes) दिवसांत प्रत्येकाच्याच घरी गरमागरम पदार्थ चहाबरोबर खाल्ले जातात. गारठ्याच्या वातावरणात बाजारात ताज्या भाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात. हिरवेगार मटारही स्वस्तात मिळतात. हिवाळा सुरू झाला की लोक एकावेळी ४ ते ५ किलो मटार विकत घेऊन जातात. (Matar Pakoda Recipe) कारण वाटाणे तुम्ही एकाचवेळी डाळ,  भाजी, पुलाव, ग्रेव्ही, खिचडी, उपमा, व्हेज बिर्याणीत वापरू शकता.

इतरवेळी लोक फ्रोजन मटार  घरी नेतात. पण हिवाळ्याच्या दिवसांत मात्र ताजे मटार खाण्याची मजा काही वेगळीच. संध्याकाळच्यावेळी चहाबरोबर खाण्याासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणात, उपवास सोडताना रात्री ताटात ठेवण्यासाठी मटारची कुरकुरीत भजी बनवू शकता. मटारची भजी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Vatana Pakoda Recipe in Marathi)

मटारची भजी कशी करायची? (How to Make Matar Bhaji)

1) अर्धवट उकडलेले मटार- ३ कप

२)  कोथिंबीर- अर्धा कप

३) लसूण- ५ ते ६ कळ्या

४) हिरवी मिरची-  ३ बारीक चिरलेल्या

५) जीरं- १ चमचा

६) बेसन  १ ते 2 चमचे

7) हिंग- अर्धा चमचा

८) कांदा- १ बारीक चिरलेला 

९) मीठ- चवीनुसार

१०) तेल-  गरजेनुसार

वाटाण्याची भजी कशी करतात? (Matar Pakoda Recipe)

१) सगळ्यात आधी मिक्सरमध्ये उकळलेले मटार, कोथिंबीर, लसूण, मीरची, जीरं घालून व्यवस्थित वाटून घ्या. 

२) त्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात मीठ, बारीक चिरलेला कांदा, हिंग आणि बेसन घालून घट्ट पेस्ट तयार करून घ्या. हे मिश्रण जास्त पातळ असू नये, अन्यथा भजी  कुरकुरीत होणार नाही.

१ कप मूग डाळीचे करा कुरकुरीत वडे; झटपट बनेल खमंग नाश्ता-एकदा खाल तर खात राहाल

३) नंतर कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मटारच्या मिश्रणाचे भजीप्रमाणे तुकडे तोडून  घाला. भजी दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होतील या पद्धतीने तळून घ्या. भजी तळताना गॅस उच्च आचेवर किंवा मध्यम आचेवर ठेवून खमंग होईपर्यंत तळून घ्या.

दुधावर भरपूर घट्ट साय येईल; फक्त दूध तापवताना सोप्या ट्रिक्स वापरा; भाकरीसारखी जाड येईल साय

४) भजीला गोल्डन रंग आल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या. कढईत एकावेळी जास्त भजी घालू नका. यामुळे भजी व्यवस्थित तळली जाणार नाही. तयार वाटाण्याची भजी टोमॅटो सॉस किंवा नारळाच्या चटणीबरोबर खा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न