मस्त फ्रेश, ताज्या भाज्या विकत मिळण्याचा एकमेव ऋतू म्हणजेच हिवाळा. हिवाळ्यात बाजारांत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात विकायला येतात. या भाज्यांमध्ये हिरवेगार मटार विकायला असतात. आपण असे हिरवेगार - ताजे मटार घरी आणून ठेवतो. मग काय नाश्ता, जेवणात आपण मटारचे अनेक पदार्थ हमखास करतोच(Matar Poha Tikki).
पोहे, मटार पॅटिस, मटार करंजी, मटार कचोरी असे अनेक ( How To Make Matar Poha Tikki At Home) चविष्ट पदार्थ नाश्त्याला केले जातात. याचप्रमाणे आपण मटार आणि पोह्यांची कुरकुरीत, चटपटीत टिक्की देखील करु शकतो. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण झटपट मटार पोह्यांची टिक्की घरच्याघरीच नाश्त्याला तयार करु शकतो. हिरव्यागार मटार पोह्यांची टिक्की करण्याची सोपी रेसिपी पाहूयात( Matar Poha Tikki Recipe).
साहित्य :-
१. मटार - १ कप
२. जाडे पोहे - १ कप
३. धणे - १ टेबलस्पून
४. काळीमिरीपूड - १ टेबसलस्पून
५. पांढरे तीळ - १ टेबसलस्पून
६. आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबसलस्पून
७. लाल तिखट मसाला - १ टेबसलस्पून
८. हळद - १ टेबसलस्पून
९. जिरेपूड - १ टेबसलस्पून
१०. मीठ - चवीनुसार
११. बेसन - १/२ कप (भाजलेले बेसन)
१२. कोथिंबीर - १ कप
१३. लिंबाचा रस - २ ते ३ टेबलस्पून
१४. तेल - गरजेनुसार
भारती सिंग मुलाला देते हेल्दी ड्रायफ्रुटस चॉकलेट्स, पाहा ते घरी कसे करायचे - रेसिपी...
हिरव्यागार द्राक्षांवर पांढरा थर ? पाहा द्राक्ष स्वच्छ धुण्याची नवी सोपी ट्रिक...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये पोहे घेऊन ते थोड्या पाण्यांत भिजवून घ्यावेत. पोहे पाण्यातून भिजवून एका बाऊलमध्ये काढून ठेवावेत.
२. मटार उकडून थोडे थंड झाल्यानंतर हलकेच मॅश करून घ्यावेत. या मॅश करून घेतलेल्या मटारमध्ये भिजवलेले पोहे घालावेत.
३. त्यानंतर त्यात थोडे क्रश केलेले धणे, काळीमिरीपूड, पांढरे तीळ, आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट, लाल तिखट मसाला घालावा.
४. मग यात हळद, जिरेपूड, चवीनुसार मीठ, भाजलेले बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस घालावा.
५. आता हे सगळे जिन्नस एकत्रित करून त्याचे पीठ मळून घ्यावे. तयार पिठाचे आपल्या आवडत्या शेपमध्ये कटलेट्स तयार करून घ्यावेत.
६. एका कढईत तेल घेऊन ते गरम करावे. या गरम तेलात तयार टिक्क्या सोडून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्याव्यात.
मटार पोहे टिक्की खाण्यासाठी तयार आहे. ही तयार गरमागरम टिक्की सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.