Lokmat Sakhi >Food > टेस्टी- हेल्दी मटार पुरी! मुलांना रोजच डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो ना.. करून बघा ही रेसिपी 

टेस्टी- हेल्दी मटार पुरी! मुलांना रोजच डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो ना.. करून बघा ही रेसिपी 

Food And Recipe: सध्या बाजारात मटारच्या शेंगा भरपूर प्रमाणात आल्या आहेत. त्याचा हा एक अतिशय चवदार पदार्थ यंदा नक्की करून बघा. मटार पुऱ्या (matar poori recipe) खाऊन मुलांसकट घरचे सगळेच खुष होतील. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 01:57 PM2022-12-22T13:57:44+5:302022-12-22T13:58:18+5:30

Food And Recipe: सध्या बाजारात मटारच्या शेंगा भरपूर प्रमाणात आल्या आहेत. त्याचा हा एक अतिशय चवदार पदार्थ यंदा नक्की करून बघा. मटार पुऱ्या (matar poori recipe) खाऊन मुलांसकट घरचे सगळेच खुष होतील. 

Matar Poori Recipe: How to make matar poori? yummy delicious matar poori recipe | टेस्टी- हेल्दी मटार पुरी! मुलांना रोजच डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो ना.. करून बघा ही रेसिपी 

टेस्टी- हेल्दी मटार पुरी! मुलांना रोजच डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो ना.. करून बघा ही रेसिपी 

Highlightsमुलांना नेहमीच डब्यात काहीतरी वेगळं आणि चवदार पाहिजे असतं. हा पदार्थ मुलांना एकदा डब्यात देऊन बघा. मटार पुरीचा आस्वाद घेऊन बच्चे कंपनी नक्कीच खुष होणार..

मुलांना नेहमीच डब्यात काहीतरी वेगळं आणि चवदार पाहिजे असतं. भाजी- पोळी असे तेच ते पदार्थ दिले की त्यांचा मूड जातो. त्यामुळे वेगळं काहीतरी असावं आणि ते यम्मी- टेस्टी असावं अशी त्यांची कायमच मागणी असते. अशावेळी त्यांच्या आईला आता असे पदार्थ रोज रोज कुठून शोधून आणायचे असा प्रश्न पडतोच. शिवाय आईला मुलांना काहीतरी हेल्दी पण खाऊ घालायचं असतं. म्हणूनच तुमची आणि मुलांची अशी दोघांचीही इच्छा पुर्ण करणारा हा पदार्थ मुलांना एकदा डब्यात देऊन बघा. मटार पुरीचा (matar poori recipe) आस्वाद घेऊन बच्चे कंपनी नक्कीच खुष होणार..(How to make matar poori?)

मटार पुरी रेसिपी
ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या nikiceipe या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
पाऊण कप ताजे मटार
कोथिंबीर
२ ते ३ हिरव्या मिरच्या

ब्लाऊज खूपच टाईट झालं? न उसवताही करता येईल परफेक्ट तुमच्या मापाचं- बघा भन्नाट आयडिया
२ टीस्पून आलं
४ ते ५ लसूण पाकळ्या 
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून ओवा
१ टीस्पून तीळ
चिमुटभर हिंग आणि हळद


पीठ मळण्यासाठी पाणी
२ कप कणिक

नवरीला वरमाला घालताच नवरदेवाने जे केलं ते पाहून बावरली नवरी, बघा नेमकं काय झालं....
पाव कप रवा
तळण्यासाठी तेल
चवीनुसार मीठ

 

रेसिपी
१. ताजे मटार, कोथिंबीर, मिरच्या, लसूण, जीरे, आलं, ओवा हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्या.

चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज,  सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार

२. आता एका भांड्यात गहू आणि रवा एकत्र करा. त्यात तीळ, आवडत असल्यास ताज्या मेथीची कोवळी पाने, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ टाका.

३. आपण केलेली वाटाण्याची पेस्ट टाकून हे पीठ मळून घ्या. गरज पडली तरच वरतून पाणी टाका. पीठ जरा घट्ट मळावं.

४. पीठ मळून झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे त्यावर झाकण ठेवून द्या आणि त्यानंतर पुऱ्या लाटायला सुरुवात करा.

५. पुरी लाटून झाली की मध्यम आचेवर छान खमंग तळून घ्या. गरमागरम पुरी सॉस, चटणी, लोणचे यासाेबत टेस्टी लागते. 


 

Web Title: Matar Poori Recipe: How to make matar poori? yummy delicious matar poori recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.