मुलांना नेहमीच डब्यात काहीतरी वेगळं आणि चवदार पाहिजे असतं. भाजी- पोळी असे तेच ते पदार्थ दिले की त्यांचा मूड जातो. त्यामुळे वेगळं काहीतरी असावं आणि ते यम्मी- टेस्टी असावं अशी त्यांची कायमच मागणी असते. अशावेळी त्यांच्या आईला आता असे पदार्थ रोज रोज कुठून शोधून आणायचे असा प्रश्न पडतोच. शिवाय आईला मुलांना काहीतरी हेल्दी पण खाऊ घालायचं असतं. म्हणूनच तुमची आणि मुलांची अशी दोघांचीही इच्छा पुर्ण करणारा हा पदार्थ मुलांना एकदा डब्यात देऊन बघा. मटार पुरीचा (matar poori recipe) आस्वाद घेऊन बच्चे कंपनी नक्कीच खुष होणार..(How to make matar poori?)
मटार पुरी रेसिपीही रेसिपी इन्स्टाग्रामच्या nikiceipe या पेजवर शेअर करण्यात आली आहे.साहित्यपाऊण कप ताजे मटारकोथिंबीर२ ते ३ हिरव्या मिरच्या
ब्लाऊज खूपच टाईट झालं? न उसवताही करता येईल परफेक्ट तुमच्या मापाचं- बघा भन्नाट आयडिया२ टीस्पून आलं४ ते ५ लसूण पाकळ्या १ टीस्पून जीरे१ टीस्पून ओवा१ टीस्पून तीळचिमुटभर हिंग आणि हळद
पीठ मळण्यासाठी पाणी२ कप कणिक
नवरीला वरमाला घालताच नवरदेवाने जे केलं ते पाहून बावरली नवरी, बघा नेमकं काय झालं....पाव कप रवातळण्यासाठी तेलचवीनुसार मीठ
रेसिपी१. ताजे मटार, कोथिंबीर, मिरच्या, लसूण, जीरे, आलं, ओवा हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्या.
चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज, सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार
२. आता एका भांड्यात गहू आणि रवा एकत्र करा. त्यात तीळ, आवडत असल्यास ताज्या मेथीची कोवळी पाने, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ टाका.
३. आपण केलेली वाटाण्याची पेस्ट टाकून हे पीठ मळून घ्या. गरज पडली तरच वरतून पाणी टाका. पीठ जरा घट्ट मळावं.
४. पीठ मळून झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे त्यावर झाकण ठेवून द्या आणि त्यानंतर पुऱ्या लाटायला सुरुवात करा.
५. पुरी लाटून झाली की मध्यम आचेवर छान खमंग तळून घ्या. गरमागरम पुरी सॉस, चटणी, लोणचे यासाेबत टेस्टी लागते.