Join us  

अर्धा लिटर दुधाची घरीच करा थंडगार मटका कुल्फी; गारेगार कुल्फी खाऊन आठवेल लहानपणीची सुटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:54 AM

Matka Malai Kulfi Recipe How to make matka kulfi at home : घरी तयार केलेली असल्यामुळे ही कुल्फी पौष्टीक असते, साखरेचं प्रमाण तुम्हाला यात कमी जास्त करता येईल. ही कुल्फी बनवायला अतिशय, सोपी आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेहमीच बाहेरचे ज्यूस, कुल्फी, आईस्क्रीम खावेसे वाटतात. दूध आपल्या सर्वाच्याच घरी असते. फक्त अर्धा लिटर दुधाचा वापर करून तुम्ही थंडगार कुल्फी घरीच बनवू शकता. घरी तयार केलेली असल्यामुळे ही कुल्फी पौष्टीक असते, साखरेचं प्रमाण तुम्हाला यात कमी जास्त करता येईल. ही कुल्फी बनवायला अतिशय, सोपी आहे. (How to make matka kulfi at home)

सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात साखर, कस्डर्ट पावडर, एक वाटी बदाम, एक वाटी काजू, ३ ते ४ वेलच्या बारीक करून पावडर तयार करून घ्या. ही पावडर एका स्वच्छ बरणीत भरा. त्यानंतर एका पॅनमध्ये दूध घालून ते गरम करायला ठेवा. त्यात केशर घालून व्यवस्थित उकळवून घ्या. एका दुसऱ्या वाटीत २ ते ३ चमचे तयार पावडर घेऊन ती दुधात मिसळून पातळ पेस्ट तयार करा. ही पेस्ट गरम दुधात मिसळा. 

बिना कांदा-लसणाचं चवदार वाटणं; एकदाच करा, आठवडाभर कोणत्याही भाजीसाठी वापरा

दूध आटल्यानंतर गॅस बंद करा हे मिश्रण एका मध्यम आकाराच्या कुल्हड किंवा कुल्फीच्या भांड्यात भरा. फॉईल पेपरनं  झाकून  फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. ६ ते ७ तासांनी कुल्फी  सेट  झाल्यानंतर खायला तयार असेल. आईस्क्रिम स्टीकच्या साहाय्यानं किंवा चमच्यानं तुम्ही आस्वाद घेऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न