Lokmat Sakhi >Food > मोड आलेल्या मटकीची झणझणीत उसळ करा फक्त १० मिनिटांत, पौष्टिक पण चमचमीत पदार्थ

मोड आलेल्या मटकीची झणझणीत उसळ करा फक्त १० मिनिटांत, पौष्टिक पण चमचमीत पदार्थ

Matki Usal Recipe :रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच यामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन्स असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:12 AM2023-04-12T10:12:10+5:302023-04-12T13:05:50+5:30

Matki Usal Recipe :रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच यामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन्स असतात.

Matki Usal Recipe : How to make perfect matki usal Maharashtrian Matki Usal | मोड आलेल्या मटकीची झणझणीत उसळ करा फक्त १० मिनिटांत, पौष्टिक पण चमचमीत पदार्थ

मोड आलेल्या मटकीची झणझणीत उसळ करा फक्त १० मिनिटांत, पौष्टिक पण चमचमीत पदार्थ

रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी कडधान्य, पालेभाज्या किंवा वेगवेगळ्या चवीच्या भाज्या ट्राय केल्या जातात. मोड आलेली कडधान्ये तब्येतीला चांगली असतात. यांच्या सेवनानं शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. (How to make perfect matki usal Maharashtrian Matki Usal)

मोड आलेल्या कडधान्यांच्या पौष्टीक उसळी तुम्ही नाश्त्यासह जेवणासाठीही खाऊ शकता. अनेकांना मिसळीच्या चवीप्रमाणे झणझणीत, तिखट चव असलेली उसळ खायला आवडते.  मटकीची चवदार, चविष्ट उसळ बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. जी लहानांसह मोठ्यांनाही आवडेल आणि सगळेचजण आवडीनं खातील. (Matki Usal Recipe)

मटकीची उसळ कशी बनवायची?

सगळ्यात आधी कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहोरी, जीरं, आलं-लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घाला.  हे साहित्य गोल्डन झाल्यानंतर त्यात कांदे, टोमॅटो, हळद आणि लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, मीठ घाला. फोडणी परतवून घेतल्यानंतर  त्यात हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेली मटकी घाला. 

चपात्या वातड होतात? मऊ, पापुद्रा सुटलेली, घडीची चपाती करण्याची योग्य पद्धत, पाहा सोपं सिक्रेट

मटकी शिजत असताना त्यात दाण्याचं कूट वरून घाला. मटकी आधीच शिजवून घेतलेली असल्यामुळे उसळ शिजायला जास्तवेळ लागणार नाही. १० मिनिटांनी पाणी थोडं आटल्यानंतर गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही भाजी सर्व्ह करा. 

ना मावा, ना कन्डेंस मिल्क; फक्त ३ ब्रेड स्लाईसचे करा गारेगार आईस्क्रीम; घ्या रेसिपी

मटकीच्या सेवनाचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच यामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन्स असतात.  यामध्ये व्हिटॅमिन बी असते. ही डाळी उच्च कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. यामध्ये अॅन्टी एजिंग एलिमेंट्स देखील आढळतात, ज्यामुळे त्वचा चमकते. त्याचबरोबर पोटाच्या अनेक समस्याही याच्या सेवनाने दूर होतात.

Web Title: Matki Usal Recipe : How to make perfect matki usal Maharashtrian Matki Usal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.