प्रोटीनयुक्त मटकी खाण्याचे अनेक फायदे आहेत. कडधान्य खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यात मुख्य म्हणजे मटकी खाण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. मटकी एक सुपरफूड म्हणून देखील ओळखले जाते. मटकीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नीज, लोह, कॉपर, सोडिअम आणि झिंक हे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.
मटकीचे अनेक पदार्थ केले जातात. मोड आलेल्या मटकीची उसळ, मटकीची भाजी, मटकीचं कालवण, पण आपण कधी मटकीची भजी खाऊन पाहिली आहे का? कुरकुरीत मटकीची भजी करायला सोपी असून, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. रोजची उसळ खाऊन कंटाळा आला असेल तर, मटकीची भजी खाऊन पाहा(Matkichi kurkurit bhaji Recipe - Moth Beans Fritters).
मटकीची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य
मोड आलेली मटकी
हिरवी मिरची
लसूण
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
जिरं
हळद
धणे पूड
लाल तिखट
ओवा
बेसन
मीठ
तेल
पाणी
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात २ कप मोड आलेली मटकी घ्या. नंतर त्यात ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, २ हिरवी मिरची आणि एक टेबलस्पून जिरं घालून जाडसर भरड तयार करून घ्या. तयार वाटलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात २ टेबलस्पून बेसन, अर्धा टेबलस्पून हळद, एक टेबलस्पून धणे पूड, दीड टेबलस्पून लाल तिखट, चिमुटभर ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून साहित्य एकजीव करा.
फ्लॉवरमध्ये अळ्या असतात, फार वेळ जातो चिरायला? ५ सोप्या टिप्स, पटकन चिरा फ्लॉवर
कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात तयार मिश्रणाचे छोटे गोळे सोडून, भजी मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे मटकीची कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी.