रोजच्या जेवणानंतर किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा प्रत्येकाचीच होते. लाडू किंवा दुसरे गोड पदार्थ बनवायला बराच सामान लागतो त्यामुळे वर्षातून काही मोजक्या प्रसंगाच्या वेळीच असे पदार्थ बनवले जातात. मावा किंवा साखरेच्या पाकाचा वापर न करता फक्त १ कप दूध वापरून मिठाई बनवण्याची एकदम सोपी रेसेपी या लेखात पाहूया. (Mawa no chashni no Milk Powder : Make 1KG Famous Sweets in just 7 minute)
दूधापासून तयार केलेली मिठाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बेसन पीठ - १ कप
कोकोनट पावडर - १ कप
तूप - १ कप
काजू- १ कप
साखर - २ कप
दूध - १ कप
वेलची पावडर- दीड कप
कृती
१) सगळ्यात आधी एक कढई गॅसवर ठेवा. त्यात बेसन पीठ घाला. बेसनाचं पीठ चांगलं परतून घ्या. त्यात १ कप कोकोनट पावडर घाला. आणि १ ते २ मिनिटं व्यवस्थित भाजून घ्या.
२) त्यात १ कप तूप घालून व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करुन घ्या. मिश्रण पातळ झाल्यानंतर त्यात १ कप काजूची पावडर घाला. हे मिश्रण एकसंथ झाल्यानंतर त्यात १ कप साखर घाला त्यानंतर १ कप दूध घाला आणि मिश्रण व्यवस्थित शिजवा.
ताज्या, रसाळ लिंबांचा रस वर्षभर वापरा; लिंबाचा रस साठवण्याची सोपी ट्रिक, पाहा व्हिडिओ
३) एकदा कागदाला तूल लावून त्यावर बटर पेपर ठेवा आणि त्यावर हे मिश्रण पसरवा आणि परत बटर पेपरनं झाकून मिश्रण सेट होण्यासाठी रूम टेंमरेचरवर २ ते ३ तास ठेवा.
४) मिश्रण सेट झाल्यानंतर त्याच्या वड्या तयार करा. तयार आहे स्वादीष्ट मिठाई.