Join us  

मेदूवडे फसतात-तेल फार पितात? त्यात मिसळा '१' खास पदार्थ; मेदूवडे जमतील परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2024 4:17 PM

Medu Vada Recipe | Sambar Vada : परफेक्ट गोलगरगरगरीत खमंग हलका मेदू वडा करा घरीच

मेदूवडे हा उडीद डाळीपासून तयार दाक्षिणात्य पदार्थ आहे (Medu vada). नाश्त्याला बहुतांश जण इडली, डोसा किंवा मेदू वडे खातात. बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असे मेदूवडे करणं तसं सोपं नाही (Cooking Tips). घरी तयार करताना मेदू वड्याला अगदी डोनटसारखा आकारही द्यायला जमणं कठीणच (Kitchen Tips).

काही वेळेला मेदूवडे करताना फसतात, तळताना कुरकुरीत होत नाही, तर काही वेळा आकार द्यायला जमत नाही. शिवाय घरगुती मेदूवडे तेल फार पितात. जर आपल्याला घरगुती परफेक्ट मेदूवडे करायचे असतील तर, त्यात एक गोष्ट मिसळा. यामुळे मेदूवडे कुरकुरीत होतील. शिवाय चवीलाही भन्नाट लागतील(Medu Vada Recipe | Sambar Vada).

मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

ना गुळ-ना साखर; तरीही मस्त जमतात सुक्या खोबऱ्याचे लाडू? पाहा पौष्टीक लाडवाची सोपी रेसिपी

पोहे

तांदुळाचं पीठ

आलं

हिरवी मिरची

कडीपत्ता

जिरं

पाणी

तेल

अशा पद्धतीने करा कुरकुरीत मेदू वडे

सर्वात आधी एका भांड्यात २ कप उडीद डाळ घ्या. त्यात पाणी घालून उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर डाळीमध्ये पुन्हा २ कप पाणी घालून त्यावर झाकण ठेवा. ५ ते ६ तासांसाठी डाळ भिजत ठेवा.

उडीद डाळ भिजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात थंड पाणी घाला. डाळीची पेस्ट झाल्यानंतर परातीत काढून घ्या. एका बाऊलमध्ये एक कप पोहे घ्या. त्यात पाणी घालून धुवून घ्या. पोहे भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची पेस्ट तयार करा.

भाजीला घरात काही नाही? ताकातलं पिठलं कधी खाऊन पाहिलं आहे का? चविष्ट रेसिपी - खाल पोटभर

पोह्याची पेस्ट उडीद डाळीच्या पेस्टमध्ये घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा तांदुळाचं पीठ घालून मिक्स करा. आता त्यात किसलेलं आलं, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, एक चमचा जिरं आणि कडीपत्ता घालून साहित्य हाताने मिक्स करा.

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. हातावर बॅटर घेऊन मेदू वड्याचा आकार द्या. गरम तेलात सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत मेदूवडे खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स