भेळ, पाणीपुरी, दहीपुरी, सामोसा, कचोरी, भेलपुरी असे चाट पदार्थ सगळेच जण आवडीने खातात. अनेकजण तर आठवड्यातून एकदा तरी हे पदार्थ तोंडाला चव येण्यासाठी खातातच. आपणही घरी कधी कधी मोठ्या हौसेने हे पदार्थ करतो. पण त्या पदार्थांना विकतच्या पदार्थांसारखी चव काही येत नाही. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे या पदार्थांना त्यांची खास चव देण्याचं काम तिखट आणि गोड चटणी करते (Meethi chutney or tamarind chutney recipe for panipuri, bhel and various chat items). गोड किंवा तिखट चटणी जर तुम्हाला परफेक्ट जमली, तर मग तुमच्या पदार्थांची चव बघा कशी छान होईल (meethi chutney recipe in marathi). म्हणूनच आता वेगवेगळ्या चाट पदार्थांसाठी लागणारी गोड चटणी (chinch gulachi chutney) कशी करायची ते पाहूया..(How to make imali khajur chutney for panipuri in marathi)
चाट पदार्थांसाठी लागणारी गोड चटणी करण्याची रेसिपी
साहित्य
७५ ग्रॅम चिंच
२५० ग्रॅम खजूर
केसांच्या 'या' ५ समस्या कमी करण्यासाठी जास्वंद वापरा
७५० ग्रॅम गूळ
चवीनुसार मीठ
१ टीस्पून चाट मसाला
त्वचेसाठी 'असा' करा संत्रीच्या सालींचा जादुई उपयोग, त्वचा नेहमीच राहील 'यंग आणि ब्यूटीफूल'
१ टीस्पून काळे मीठ
२ टीस्पून जीरा पावडर
२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
कृती
सगळ्यात आधी तर चिंचेमधले चिंचुके आणि खजुरातल्या बिया काढून घ्या आणि ते दोन्ही एकत्र करून एका भांड्यात पाणी घेऊन त्यात उकळून घ्या.
उकळून घेतलेली चिंच आणि खजूर थंड झाले की ते मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या आणि गाळणीने गाळून घ्या.
मुरमुऱ्यांच्या ३ चवदार रेसिपी- गॅस वापरण्याचीही गरज नाही, ५ मिनिटांत चवदार स्नॅक्स तयार
आता चिंच, खजूराचा जो गाळून घेतलेला गर आहे, त्यात गूळ, मीठ, काळं मीठ, चाट मसाला, लाल तिखट, जिरेपूड टाका. त्यातच १ लीटर पाणी घाला आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून गॅसवर उकळायला ठेवा.
साधारणपणे अर्धा तास हे मिश्रण मंद आचेवर उकळू द्या आणि नंतर थंड झाल्यावर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.
ही चटणी फ्रिजमध्ये ठेवल्यास १ महिना टिकू शकते असं ही रेसिपी शेअर करण्यात आलेल्या yflhome या इन्स्टाग्राम पेजवर सांगितलं आहे.