एरवी आपण लिंबू, टोमॅटो, आवळा, चिंच असे आंबट पदार्थ कितीही खात असलो, तरी कैरीची गोष्ट काही न्यारीच आहे. कैरीचा हंगाम एकदा सुरू झाला की आंबट कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण कधी एकदा करून खातो, असं होऊन जातं. आता बाजारात छान हिरव्यागार कैऱ्या आलेल्या आहेत. कैरीचं तात्पुरतं लोणचं तर आपण नेहमीच करतो. आता त्या कैऱ्यांचा आंबट- गोड चटपटीत मेथांबा करून पाहा (spicy delicious raw mango chutney recipe). जेवणात तोंडी लावायला हा पदार्थ असेल तर जेवणाची रंगत नक्कीच आणखी वाढेल. (how to make methamba?)
कैरीचा मेथांबा तयार करण्याची रेसिपी
साहित्य
१ मोठी कैरी
१ टीस्पून मेथ्या
फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी
हॉलमध्ये 'कॉर्नर पीस' म्हणून ठेवता येण्यासारखी ५ सुंदर रोपं
१ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून काळा मसाला
अर्धी वाटी गूळ
चवीनुसार मीठ
कृती
१. सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून घ्या आणि तिची सालं काढून घ्या.
२. यानंतर कैरीचे बारीक काप करा.
फक्त ३ पदार्थ वापरून घरीच तयार करा होळीचे रंग- बघा ऑर्गेनिक रंग बनविण्याची सोपी पद्धत
३. कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये तेल टाकून फोडणी करून घ्या. फोडणी करताना त्यात मेथ्या घाला. फक्त चांगल्या परतून निघायला हव्या. फक्त त्या जळणार नाही याची काळजी घ्या.
४. फोडणी झाल्यानंतर त्यात चिरलेली कैरी टाका आणि एकदा व्यवस्थित हलवून घ्या. यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि वाफ काढून घ्या.
'आता ए साला कप नामदू' म्हणत स्मृती मंधाना जिंकली मनं; जे पुरुष संघालाही जमलं नाही..
५. जेव्हा कैरी चांगली वाफाळली जाईल आणि मऊ होईल तेव्हा त्यात गूळ, तिखट, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घाला.
६. गूळ घातल्यानंतर सुरुवातीला गुळाचा पाक होईल. त्या पाकात कैरी छान शिजेल. जेव्हा पाक आटून थोडा कमी होईल, तेव्हा गॅस बंद करा. तुमचा चटपटीत चवदार मेथांबा तयार झालेला असेल.