हिवाळ्यात पौष्टीक लाडू (Healthy Laddoo) खाल्ले जातात. यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. विविध प्रकारचे लाडू खाल्ल्याने शरीरातील विविध अवयवांना याचा फायदा होतो (Health Tips). पौष्टीक लाडूमध्ये मेथी दाण्यांचाही समावेश आहे. संपूर्ण भारतात मेथी दाण्यांचे (Fenugreek Seeds) सेवन केले जाते. मेथी शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यात सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे वजन कमी, केसांच्या निगडीत समस्या यासह त्वाचेला तजेलदार करण्याचं काम मेथी दाणे करतात.
मेथी दाणे सहसा खाण्यास लोक टाळतात. त्यामुळे आपण मेथी दाण्याचे पौष्टीक लाडू खाऊ शकता. जे लोक मेथी दाणे खाताना नखरे करत असतील त्यांना मेथी दाण्याचे लाडू खायला द्या. जर आपल्याला मेथी दाण्याचे लाडू करायला जमत नसेल तर, प्रमाण चुकत असेल तर, या रेसिपीला फॉलो करून पाहा. झटपट मेथी दाण्याचे पौष्टीक लाडू तयार होतील(Methi Goond ladoo/ Fenugreek ladoo; make in 15 minutes).
मेथी दाण्याचे पौष्टीक लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य
मेथी दाणे
तूप
खजूर
सुकं खोबरं
डिंक
गव्हाचं पीठ
जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट
गुळ
खसखस
ड्रायफ्रुट्स
कृती
सर्वात आधी गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात ३० ग्रॅम मेथी दाणे घालून भाजून घ्या. मेथी दाणे भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्याची पावडर तयार करा. त्यात ५० ग्रॅम तूप घाला. आणि चमच्याने मिक्स करा. आणि २ दिवस त्यावर झाकण ठेवून भिजत ठेवा.
नंतर कढईमध्ये १ मोठा चमचा तूप घाला. त्यात २५० ग्रॅम बिया काढलेले खजूर घालून भाजून घ्या. भाजलेले खजूर एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर त्यात सुकं किसलेलं खोबरं घालून भाजून घ्या. हवं असल्यास आपण त्यात तूप घालू शकता. भाजलेलं किसलेलं सुकं खोबरं एका परातीत काढून घ्या.
नंतर कढईमध्ये ३ मोठे चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात ५० ग्रॅम डिंक घाला. फ्राय केलेले डिंक एका प्लेटमध्ये काढून घ्या. कढईत पुन्हा ३ मोठे चमचे तूप घाला. आणि १५० ग्रॅम गव्हाचं पीठ घालून भाजून घ्या. भाजलेलं गव्हाचं पीठ परातीत काढून घ्या. नंतर त्यात २ मोठे चमचे खसखस, ड्रायफ्रुट्स घालून भाजून घ्या. मग गुळ घाला. गुळ विरघळल्यानंतर त्यात भिजलेल्या मेथी दाण्याची पावडर घालून मिक्स करा. आणि परातीत काढून घ्या.
युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन
नंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले खजूर घालून बारीक पावडर तयार करा. आणि परातीत काढून घ्या. सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करा. हाताला थोडे तूप लावा, आणि थोडे मिश्रण घेऊन लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे मेथी दाण्याचे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी.