चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी नेहमीच काहीतरी कुरकुरीत, खमंग पदार्थ खाण्याची इच्छा होते. Methi Puri (Poori) पॅकेज्ड केलेले तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही घरी बनवलेले पदार्थ खाल्ले तर पौष्टीक असतील आणि त्रासही उद्भवणार नाही. हिवाळ्यात मेथी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. (Methi Puri Recipe) मेथी फक्त चवीला उत्तम नसते तर आरोग्याच्या दृष्टीनेही मेथीचे अनेक फायदे आहेत. यामुळे रक्तदाब, डायबिटीज, अपचन, हाय बीपी सारख्या समस्या नियंत्रणात राहतात. मेथीची भाजी खायला घरातील लोक कंटाळत असतील तर तुम्ही पुरीमध्ये मेथीचा वापर करू शकता. (How to Make Methi Puri at Home)
मेथी पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य (Methi Puri Making Steps)
1)लगव्हाचे पीठ- १ कप
2) निवडलेली मेथीची पानं- अर्धा कप
3) हळद- अर्धा टिस्पून
4) लाल मिरची पावडर- अर्धा टिस्पून
पनीर-दूधापेक्षा जास्त प्रोटीन असलेले ५ व्हेज पदार्थ; रोज खा, अशक्तपणा कमी करण्याचा सोपा मार्ग
5) ओवा- अर्धा चमचा
6) मीठ- चवीनुसार
7) तेल - गरजेनुसार
मेथीची कुरकुरीत पुरी करण्याची सोपी पद्धत (How to Make Methi Puri)
१) मेथी पूरी करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्या पीठात मेथी, बेसन, हिंग, ओवा, मीठ आणि तेल घालून हातांनी व्यवस्थित मळून घ्या. न विसरता यात तेलाचे मोहन घाला. मोहन घालायला विसरलात तर पुऱ्या कुरकुरीत होणार नाहीत.
२) जेव्हा सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून होईल तेव्हा थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्या. यात तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालू शकता.
चपात्या कडक होतात-धड फुगत नाही? ५ टिप्स, चपात्या फुगतील भरपूर-होतील मऊसूत
३) कढईत तेल घालून त्यात गोळे चपटे करून लहान लहान आकाराच्या पुऱ्या तळून घ्या.
४) कढईत तेल घालून गॅस मंच आचेवर ठेवा आणि एकामागोमाग एक पुऱ्या तळून घ्या. तेल गरम झाल्यानंतर पुरी कुरकुरीत होईपर्यंत तळा.