Join us

मेथीची भाजी नेहमीच कशाला शिजवून खायची? एकदा कच्च्या मेथीचा घोळाणा खाऊन पाहा, घ्या रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2024 09:15 IST

Winter Food And Recipe: सध्या हिवाळा असल्याने बाजारात मेथीची हिरवीगार भाजी भरपूर प्रमाणात मिळते (how to make fenugreek salad?). त्या कच्च्या मेथीचा एकदा घोळाणा करून पाहाच..(methicha gholana recipe in Marathi)

ठळक मुद्देशिजवून खाण्यापेक्षा कच्ची मेथी किंवा मेथीचा घोळाणाच अधिक चवदार लागतो, असं तुम्हाला नक्कीच वाटेल.  बघा अगदी ५ मिनिटांत तयार होणारी ही अतिशय सोपी रेसिपी

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यातही मेथीख करडई या भाज्या खूप जास्त प्रमाणात आणि एकदम स्वस्त असतात. इतर कोणत्याही ऋतूपेक्षा हिवाळ्यात मिळणाऱ्या पालेभाज्या या अधिक फ्रेश असतात. त्यामुळे या दिवसात जास्तीतजास्त पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. आता मेथी किंवा करडई या भाज्या नेहमीच शिजवून खाण्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने खाऊन पाहा. त्यासाठी पुढे सांगितलेल्या पद्धतीने एकदा जेवणात तोंडी लावण्यासाठी मेथीचा घोळाणा करून पाहा (how to make fenugreek salad?). शिजवून खाण्यापेक्षा कच्ची मेथी किंवा मेथीचा घोळाणाच अधिक चवदार लागतो, असं तुम्हाला नक्कीच वाटेल.  बघा अगदी ५ मिनिटांत तयार होणारी ही अतिशय सोपी रेसिपी (methicha gholana recipe in Marathi)

मेथीचा घोळाणा करण्याची रेसिपी

 

साहित्य

अडीच ते तीन कप बारीक चिरलेली मेथी

१ मध्यम आकाराचा कांदा

१ मध्यम आकाराचा टोमॅटो

मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल लागतोच? ३ गोष्टी करा, स्क्रीन बघत जेवण्याची सवय कायमची सुटेल 

चवीनुसार लाल तिखट आणि मीठ

फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग आणि तेल

३ टेबलस्पून दही 

 

कृती

सगळ्यात आधी दही फेटून एकसारखं करून घ्या. कांदा, टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्या.

एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेली मेथी, कांदा, टोमॅटो एकत्र करा. 

केस खूप गळतात? खोबरेल तेलात २ पदार्थ टाकून मालिश करा, केस वाढतील भराभर- हाेतील दाट

त्यात चवीनुसार मीठ आणि तिखट टाका. एका छोट्या कढईमध्ये फोडणी करा आणि ती फोडणी कच्च्या मेथीवर घाला. त्यासोबतच दही घालून सगळं व्यवस्थित हलवून घ्या. मेथीचा खमंग घोळाणा झाला तयार. अशाच पद्धतीने तुम्ही करडईचा घोळाणा करू शकता.

 

या गोष्टीही करून पाहा..

मेथीचा घोळाणा वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. त्यातली वरची पद्धत तर आपण पाहिली. 

आता दुसरी पद्धत म्हणजे दही न घालता लिंबू पिळायचं.

कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल

तसेच फोडणी द्यायची नसेल तरीही चालते. जे लोक खूप कमी तेल खातात ते बिना फोडणीचा घोळाणाही खाऊ शकतात.

घोळाणा करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे फोडणी न घालता नुसतं कच्चं तेल घालून घोळाणा करायचा. यापैकी कोणत्याही पद्धतीने केलेला मेथीचा घोळाणा चवदारच होतो. 

 

टॅग्स :हिवाळ्यातला आहारकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीअन्न