Join us  

कोबीची पचडी नेहमीची हिवाळ्यात करा मेथी आणि करडईची पचडी, ५ मिनिटांत होणारा खमंग पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 3:31 PM

Food And Recipe: मेथीची पचडी किंवा करडईची पचडी हा कोशिंबीरीसारखाच एक प्रकार आहे. हिवाळ्यात अगदी आवर्जून करायला पाहिजेच असा (How to make methichi pachadi?)....

ठळक मुद्देरात्रीच्या जेवणात कधी खिचडी केली असेल तरीही मेथीची किंवा करडईची पचडी तोंडी लावायला घ्या... जेवणात छान रंगत येईल.

हिवाळ्यात पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. शिवाय इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या अधिक ताज्या, लुसलुशीत असतात. त्यामुळे भाजी, पराठा या माध्यमातून तर आपण भाज्या खातोच. पण कधीतरी कच्ची मेथी किंवा कच्ची करडई भाजी घालून केलेली खमंग, चवदार पचडीही करून पाहा. जेवणात कोशिंबीरीप्रमाणे तोंडी लावायला तुम्ही पचडी खाऊ शकता (How to make methichi pachadi?). किंवा मग एखाद्या वेळी जेवणात इतर काेणती भाजी  नसेल तर ही कच्ची भाजीही पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. काही ठिकाणी पचडीलाच मेथीचा घोळाणा असेही म्हणतात. (methichi pachadi recipe in marathi)

मेथीची खमंग पचडी करण्याची रेसिपी

 

मेथीची किंवा करडईची पचडी करण्याची रेसिपी सारखीच आहे. तुमच्या आवडीनुसार कधी कच्ची मेथी तर कधी कच्ची करडई घालून ही रेसिपी करून पाहा.

साहित्य

२ वाट्या मेथीची कच्ची भाजी किंवा करडईची भाजी

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये खूप घाण- माती अडकली? १ सोपा उपाय- विंडो ट्रॅक होईल चकाचक

१ मध्यम आकाराचा कांदा

१ मध्यम आकाराचा टोमॅटो

अर्ध्या लिंबाचा रस

१ टीस्पून जीरेपूड

चवीनुसार तिखट आणि मीठ

फोडणीसाठी तेल, मोहरी आणि हिंग

 

कृती

सगळ्यात आधी मेथी किंवा करडई ज्याची पचडी करणार आहात, ती नीट निवडून स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर ती बारीक चिरून घ्या. कांदा आणि टोमॅटोही बारीक चिरून घ्या.

भारताची मँगो लस्सी जगात भारी, बघा TasteAtlas च्या टॉप १० यादीत असणारे ३ भारतीय पेय

यानंतर एका मोठ्या भांड्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि मेथी घ्या. त्यात तिखट, मीठ, जिरेपूड घालून लिंबू पिळा.

हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की त्यावरून फोडणी घाला. चवदार पचडी झाली तयार.

लिंबाच्या ऐवजी तुम्ही दह्याचा वापरही करू शकता. तसेच फोडणी नाही घातली तरी चालते. पचडी चवदारच लागते.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती