भारतीय घरांमध्ये अन्न वाया जाऊ देत नाहीत. जर रात्रीचे अन्न उरले असेल तर, दुसर्या दिवशी नाष्ट्याला ते आपण खातो. पोळी, भात अशा पदार्थांना फोडणी देऊन नवीन पदार्थ तयार करतो. (milk burnt again? do these 5 remedies it won't stink )एकंदरीत काय तर घरात काही वाया जाता कामा नये. अगदी दूधही.दूध बरेचदा नासते. मग ते खराब म्हणून आपण फेकत नाही. ते वाया जाऊ नये म्हणून आपण नासकवणी, पनीर असे पदार्थ तयार करतो. दूध नासल्यावर हे उपाय ठीक आहेत. (milk burnt again? do these 5 remedies it won't stink )पण जर दूध करपले तर? करपलेल्या दुधाचा वास फारच विचित्र येतो. त्यामुळे मग त्याचे पदार्थ तयार करून खाण्याची इच्छाही होत नाही. काहींना त्या वासाने ढवळायला लागते. हा वास घालवण्यासाठी काही उपाय आहेत. ते केल्यावर दुधाला करपलेला वास येणार नाही. आणि दुधाचा वापर करता येईल.
१. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे भांड बदला. दुधाला वास लगेच लागत नाही. त्यामुळे दूध करपायला लागल्यावर लगेच ते दुसर्या भांड्यात ओता. वरवरचे चांगले दूधच वापरा.
२. करपलेल्या दुधात ब्रेडचा तुकडा टाका. तो सगळा करपल्याचा वास आणि चव खेचून घेतो. ५ मिनिटांनी तो तुकडा दुधातून काढून टाका. त्यानंतर तुम्हाला हवे तसे ते दूध वापरता येते.
३. दुधात व्हॅनिला इसेंसचे काही थेंब टाका. त्या दुधाला येणारा वास गायब होतो. दुधाची चवही छान लागते. एखादा गोड पदार्थ तयार करण्यासाठी ते दूध अगदीच योग्य ठरेल.
४. सोपा उपाय करायचा असेल तर साखर वापरा. साखर तर घरात असतेच. करपलेल्या दुधाचे भांडे बदला. त्यामध्ये चमचाभर साखर घाला. दुधाचा वास निघून जाईल. चहासाठी दूध वापरणार असाल तर, जास्त साखर घालू शकता.
५. करपलेल्या दुधात अगदी थोडीशी दालचिनीची पूड घाला. थोड्याच वेळात दुधाचा वास निघून जाईल. त्या दुधापासून तयार केलेले पदार्थही जास्त चविष्ट लागतील.